buldhana : मागील काळात दरोडेखोरांकडून लुटमार झाल्याच्या घटना समृद्धी महामार्गावर samruddhi mahamarg घडल्या. याच घटनांची पुनरावृत्ती ७ ऑक्टोबरला होता होता टळली. धावत्या लक्झरी बसवर अज्ञात आरोपींनी रात्री सव्वा अकराच्या सुमारास दगडफेक केली. समोरील काच फुटून चालकासह दोन प्रवासी किरकोळ जखमी झाले. दरोड्याच्या उद्देशाने वाहन थांबविण्याकरिता दगडफेक करण्यात आल्याचा संशय आहे.समृद्धी महामार्गावरून samruddhi mahamarg एमएच २९-बीई-६७७७ क्रमांकाची लक्हारी बस ७ ऑक्टोबरला रात्री प्रवासी घेऊन निघाली होती.
बुलढाणा buldhana जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर देऊळगाव कोळ ते बीबीकडे जाणाऱ्या ओव्हर ब्रीजवर चॅनेल क्रमांक ३०७.१ जवळ रात्री सव्वा अकरा वाजता अज्ञात आरोपींनी दगडफेक केली. यात केबीनसमोरील काच फुटल्याने चालक रुपेश माधव रुडे (रा. मांडवा ता. डिग्रस, जि. यवतमाळ) यांच्यासह प्रवासी राजेंद्र राठोड (४३, महाळुंगी ता. आर्णी, जि. यवतमाळ) व अनिल गवई (सारंगपूर वाडी, जि. यवतमाळ) हे किरकोळ जखमी झाले. या घटनेबद्दल माहिती समजताच महामार्ग पोलीस दलाचे पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र राऊत, पोहेकॉ विठ्ठल काळुसे, प्रवीण पोळ व महाराष्ट्र सुरक्षा बलचे जवान श्रावण घट्टे, नागरे घटनास्थळी पोहोचले. जखमींवर समृद्धी महामार्गावरील रुग्णवाहिकेचे डॉ. वैभव बोराडे यांनी उपचार केले.
घटनेच्या पार्श्वभूमीवर बीबी पोलीस ठाण्याचे संदीप पाटील, पोलीस अंमलदार अरुण सानप, चव्हाण, भगवान नागरे यांनी परिसरात आरोपींचा शोध घेतला. मात्र काहीच थांगपत्ता लागला नाही. चालकाच्या प्रसंगावधानाने टळली मोठी दुर्घटना ट्रॅव्हल्सचालकाने प्रसंगावधान राखत ‘लक्झरी बस’ सुरक्षित ठिकाणी बाजूला घेतली. वाहन वेगात होते, त्यात भिरकावलेला दगड काच फुटून आत शिरला. चालकाचे नियंत्रण सुटले असते तर मोठा अनर्थ घडला असता. समृद्धी महामार्गावर samruddhi mahamarg नागपूर महामार्ग पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके यांच्या आदेशाने पोलिसांची दोन वाहने रात्रीची गस्त घालतात. तरीदेखील अशा घटना घडत असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.