सागर बोदडे/मोताळा प्रतिनिधी
मोताळा तालुक्यातील नळगंगा धरण (nalganga dam) काल झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर्णपणे भरले आहे. धरणाचा शंभर टक्के जलसाठा पूर्ण झाला असल्यामुळे धरणाची साठवणूक पूर्ण झालेली आहे. मुसळधार झालेल्या पावसामुळे धरणाचे 11 ही गेट एकाच वेळेस एक फुटाणे उघडले गेले आहेत. त्यामुळे नळगंगा नदीच्या संपर्कात येणाऱ्या पिंपळपाटी, शेलापुर, दाताळा व नदी काठावरील इतर गावांना अलर्ट जारी करून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.