बुलढाणा |२३ मार्च २०२६
आंतरराष्ट्रीय स्तरावर युद्धभूमीवर घडणाऱ्या घटनांचा परिणाम आता थेट महाराष्ट्रातील गावांमध्येही दिसून येत आहे. युद्धात जखमी झालेल्या मोस्तबा खामेनी यांच्या प्रकृतीसाठी दुवा करण्याच्या मुद्द्यावरून बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव सराई येथे मशिदीत मोठा वाद उफाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जखमी खामेनी यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी मशिदीत दुवा करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. मात्र, या मुद्द्यावरून स्थानिक स्तरावर मतभेद निर्माण झाले आणि हा वाद चिघळत गेला.
यावेळी संबंधित मौलानांसोबत स्थानिक असलम खान अबदार खान यांचा तीव्र वाद झाला. वाद इतका वाढला की, मौलानांना मशिदीतून खोली खाली करण्याचा इशारा देण्यात आला. एवढेच नाही तर त्यांच्या कुटुंबीयांवर मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी मौलानांच्या तक्रारीवरून रायपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, एका आंतरराष्ट्रीय घटनेच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर निर्माण झालेला हा वाद सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. युद्धभूमीवर घडणाऱ्या घटनांचा थेट परिणाम सामाजिक वातावरणावर होत असल्याचे या घटनेतून स्पष्ट होत आहे.
Related News
- बुलढाण्यात बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा भंडाफोड! १५ कर्मचारी सस्पेंड
- मेहकर पालिकेचा मोठा घोटाळा उघड! 1.87 कोटी भरण्याचे आदेश, प्रशासनाचा मोठा धक्का
- गुंज येथे शिवजयंती मिरवणुकीत राडा; ३ आरोपींना न्यायालयीन कोठडी
हे आवश्यक करा
अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी Kattanews.in ला नियमित भेट द्या.










