साखरखेर्डा प्रतिनिधी
बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील हिवरा आश्रमला लागूनच असलेल्या ओलांडेश्वर तीर्थक्षेत्र येथील पैनगंगा नदी पात्रावर अंघोळीसाठी गेलेला रवींद्रचा पाय घसरून नदीपात्रात पडला व पाण्याच्या प्रवाहामध्ये तसाच वाहत गेला. रवींद्र हा साखरखेर्डा येथील रहिवाशी परंतु शिर्डी येथील साईबाबा संस्थान मध्ये नोकरीला असलेला येथील संस्थांमध्ये नोकरीला होता, शुक्रवारी दुपारच्या सुमारास हिवरा आश्रम जवळील पैनगंगा नदी काठावरील ओलांडेश्वर, तीर्थक्षेत्रावर स्नान करीत असतांना पाय घसरून वाहून गेला होता. १४ सप्टेंबर, शनिवारी सकाळी त्याचा मृतदेह आढळून आला आहे.
साखरखेर्डा येथील रविंद्र नामदेव नन्हई, (वय ४० वर्षे) हा तरुण शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या रुग्णालयात ऑपरेशन विभागात कामाला होता. महालक्ष्मी सण साजरा करण्यासाठी तो गावी साखरखेर्डा येथे आला होता. १३ सप्टेंबर, शुक्रवारी नन्हई कुटुंबीय ओलांडेश्वर संस्थानावर दर्शनासाठी गेले होते. रविंद्र नन्हई हा तेथील पैनगंगा नदीत स्नान करण्यासाठी गेला होता. त्यावेळी पाय घसरुन तो नदी पात्राच्या प्रवाहात पडला व वाहून गेला.
पत्नी, भाऊ, भावजय, घरातील चिमुकली मुले उपस्थित भक्त मंडळींच्या डोळ्यासमोर वाहून गेल्याने त्यांनी आरडाओरडा करून एकच हंबरडा फोडला. तिथे उपस्थित दुधा, ब्रम्हपुरी येथील काही ग्रामस्थांनी तात्काळ उड्या मारुन रविंद्रचा शोध घेतला. परंतु त्याचा ठावठिकाणा लागला नाही. यंत्रणेला ही बाब कळताच उपविभागीय अधिकारी रविंद्र जोगी, तहसीलदार अजय पिंपरकर यांच्यासह पोलिस, महसूल आदि विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच एन.डी.आर.एफ चे जवान सुद्धा घटनास्थळी पोहोचले.
शोधकार्य सरु करण्यात आले.मात्र सायंकाळपर्यंत रविंद्रचा शोध लागला नव्हता.१४ सप्टेंबरला सकाळी पुन्हा रेस्क्यु पथकाने शोध कार्य सुरू केले असता सकाळी १०.४० वाजेच्या सुमारास रविंद्रचा मृतदेह पाण्यात आढळून आला आहे. पंचनामा करीत, मृतदेह शवविच्छेदनासाठी मेहकर येथे रवाना करण्यात आला आहे.