Buldhana : बँकेत पैसे भरण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याच्या पिशवीतून भामट्या चोरांनी केले दीड लाख रुपये गायब.

 

 

रामदास कहाळे/प्रतिनिधी

 

Buldhana : सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा येथे एका शेतकऱ्याच्या पिशवी मधून अलगद दीड लाख रुपये चोरी गेल्याची घटना घडली आहे. साखरखेर्डा येथील चिखली अर्बन बँकेमध्ये हा सर्व प्रकार घडून आला आहे आणि हा प्रकार कॅमेऱ्यामध्ये टिपला गेलेला आहे.

 

 

 

सविस्तर वृत असे की साखरखेर्डा जवळच अगदी १०  किलोमीटर अंतरावर असलेल्या रताळी गावातील शेतकरी ज्ञानेश्वर तेजराव पाटील नियमित बँकेमध्ये पैसे जमा करण्यासाठी जात असतात. ठरल्याप्रमाणे त्यांनी साखरखेर्डा स्टेट बँक बँकेमधील पाच लाखाची रक्कम काढली. पोळ्याचा बाजार असल्यामुळे बाजार सुद्धा केला व काढलेल्या रकमेतील तीन लाख रुपये चिखली अर्बन बँकेच्या साखरखेर्डा खात्यात सुद्धा टाकले. व उर्वरित शिल्लक राहिलेली दोन लाख रुपये रक्कम त्यांच्यासोबत असलेल्या पिशवीमध्ये होती.

 

 

 

मात्र ज्ञानेश्वर पाटील यांचे लक्ष काउंटर वर असल्यामुळे त्यांचा पाठलाग करत आलेले भामटे चोर त्यांच्या पाठीमागेच होते तेव्हा त्यांनी पिशवी मधील अलगद दीड लाख रुपये काढून घेतले ही गोष्ट जेव्हा ज्ञानेश्वर पाटील यांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी बँकेमधील सीसीटीव्ही कॅमेरे तपास केले असता तेव्हा त्यामध्ये दोन भामटे चोर दिसून आल्याचे कळले बातमी देईपर्यंत कुठलाही प्रकारची पोलीस कारवाई झाली नव्हती. साखरखेर्डामध्ये चोरीच्या अशा घटनांची वाढ होत आहे. दिवसाढवळ्या बँकेमधून दीड लाख रुपये चोरी गेल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.