बुलढाणा जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी या कर्तुत्ववान अधिकाऱ्यांनी स्वीकारला पदभार.

 

 

कट्टा न्यूज / बुलढाणा प्रतिनिधी

 

अवघ्या दोन महिन्यांपूर्वी रुजू झालेले बुलढाणा जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांची सोलापूर येथे बदली झाली आहे. अगदी दोन महिन्यापूर्वी आलेल्या कुलदीप जंगम यांची बदली दोन महिन्यांमध्ये का झाली असावी..? मागील नेमके कारण काय असावे ? याबाबतीत अनेक चर्चा व तर्क करण्यास सुरुवात झाली आहे.

 

 

 

बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांची नियुक्ती सोलापूर येथे झाले असून. आणि सोलापूरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांची नियुक्ती पुणे स्मार्ट सिटी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून करण्यात आलघ आहे. सोलापूर जिल्ह्यात चे कार्यकारी अधिकारी म्हणून कुलदीप जंगम यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे पत्र सामान्य प्रशासन विभागाच्या मुख्य सचिव व्हि. राधा यांनी आव्हाळे यांना दिले आहे.

 

 

 

आणि मनीषा आव्हाळे यांनी सोलापूरच्या मुख्य कार्यकारी पदाचा कारभार कुलदीप जंगम यांना सोपवून लवकरात लवकर पुणे येथे रजू व्हावे. असे मनीषा आव्हाळे यांच्या आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे. कुलदीप जंगम यांनी अवघ्या दोन महिने पूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला होता. 7 जून रोजी ते आपल्या पदावर रुजू झाले होते. त्यांनी जिल्ह्यामध्ये अनेक विकासाची कामे केली आहे तर. परंतु असे असतानाही त्यांची बदली एवढ्या लवकर का झाली असावी..? त्या मागचे नक्की कारण काय असावे..? की यामागे काही राजकारण तर नव्हे ना.?  अशी अनेक खलबत्ते जिल्ह्यामध्ये होत आहेत.

 

B.M Mohan बी.एम.मोहन 

 

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून असलेले बी.एम.मोहन यांनी प्रभारी म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे. बी.एम.मोहन यांच्याकडे एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून बघितले जाते. आता नियमित मुख्य कार्यकारी अधिकारी येईपर्यंत सीईओ  पदाचा कारभार सध्या त्यांच्यासाठी आहे.