
बुलढाणा /प्रतिनिधी
बुलडाणा ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रातील वस्तीगृहाच्या इमारतीमध्ये चक्क अस्वल शिरल्याची घटना घडली आहे. २७ सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता दरम्यान या इमारतीमध्ये अस्वल घुसल्याची घटना घडल्यामुळे बुलडाणा शहरांमध्ये खळबळ उडाली आहे. या अस्वलाला पकडण्यासाठी वन विभागाच्या पथकाला आठ तास रेस्क्यू करावे लागले त्यानंतर कुठे अस्वला पकडण्यात यश आले. या अस्वलाला पकडल्यानंतर आंबा बारवा अभयारण्य सोडून देण्यात आले.
सविस्तर वृत्त असे की बुलडाणा येथे जिल्हा कारागृहापासून अगदी जवळ असलेल्या ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र येथे नेहमीच ग्रामसेवकांचे प्रशिक्षण घेतले जाते. या प्रशिक्षण केंद्रामध्ये 52 खोल्यांचे वस्तीगृह सुद्धा आहे.२७ सप्टेंबरच्या सात ते आठ वाजे दरम्यान एक अस्वल गेटमधून या इमारतीमध्ये शिरले. याची माहिती पहारेकऱ्यांना मिळताच त्यांनी इमारतीचे मुख्य गेट बंद केले. व सदर घटनेची माहिती ही वन विभागाला दिल्यानंतर बुलढाणा प्रादेशिक चे
वनपरिक्षेत्र अधिकारी अभिजीत ठाकरे, रेस्क्यू पथक व शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक नरेंद्र ठाकरे हे सुद्धा ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रामध्ये दाखल झाले. पिंजरा लावण्याची व्यवस्था नसल्यामुळे २८ सप्टेंबर च्या सकाळी सकाळी ३:३० वाजता टॅग्युलायझर गणने इंजेक्शन मारून असोला बेशुद्ध करण्यात आले व त्यानंतर पिंजऱ्यात घालून या अस्वलाला अंगबार व अभयारण्यामध्ये सोडून देण्यात आले असल्याची माहिती ठाकरे यांनी दिली.