सागर बोदडे/ मोताळा
काल रात्री जाहिर झालेल्या वंचित बहुजन आघाडी च्या यादी मध्ये बुलडाणा (Buldhana) विधानसभा मतदार संघाची उमेदवारी सदानंद माळी यांना मिळाली म्हणुन सर्व आंबेडकरी समाजात नाराजी दिसुन येत आहे. वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा नेते प्रशांत वाघोदे हे एकमेव उमेदवार पक्षासाठी योग्य असताना व समाज भावना त्यांच्या सोबत असताना सदानंद माळी यांना उमेदवारी जाहीर होणं हे कुठेतरी पक्षासाठी हानीकारक आहे.
प्रशांत वाघोदे हे संघर्षशिल नेतृत्व आहे,त्यांच्या मुळे बुलडाण्यात वंचित पक्ष जिवंत आहे पण हजारो आंदोलनं,मोर्चे,वंचित घटकातील प्रत्येकाला न्याय मिळवून देण्याचं काम प्रशांत वाघोदे यांनी केले आहे म्हणुन या वेळी तरी त्यांना पक्ष उमेदवारी देऊन त्यांचा सत्कार करेल अशी आशा होती पण समाजाच्या झोळीत निराशाच पडली.सदानंद माळी हे अगोदर पक्ष सोडुन गेले,उबाठा मध्ये नेते आहे त्यांना उमेदवारी का मिळाली असा संताप या वेळी समाजात होत आहे.
आम्ही अक्षरशः ग्राऊंड लेवलला कामं करतो, दहा दहा वर्षे पक्ष बांधणी करतो, आमच्या मताला काही किंमत आहे का? असा सवाल पक्षातील पदाधिकारी यावेळी करत आहेत. पक्षनेतृत्वाने आमच्या भावनांची कदर करून ही उमेदवारी प्रशांत वाघोदे यांना द्यावी अशी अपेक्षा करतो.