Buldhana : मुलीला गाढ झोप लागु देल्यानंतर, विवाहितेने उचलले हे पाऊल..

 

 

देऊळगाव राजा/प्रतिनिधी

 

चिखली तालुक्यातील “अंंढेरा” पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या आंत्री खेडेकर या गावातील विवाहितेने रात्रीला घरामध्ये १० वर्षाची मुलगी व पती झोपलेले असताना कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेली. आजूबाजूला व परिसरामध्ये शोध घेतला असता कुठेही विवाहितेचा पत्ता लागला नाही अशी तक्रार महिलेची पतीने २७ सप्टेंबर रोजी अंधेरा पोलीस स्टेशनला दिली.

 

 

 

सविस्तर वृत्त असे की अंत्री खेडेकर येथील रहिवाशी असलेले ज्ञानेश्वर शिवनारायण खेडेकर (३३ वर्षे) यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की पत्नी पूजा ज्ञानेश्वर खेडेकर वय २४ वर्षे. आम्ही सर्वजण रात्री जेवण करून घरामध्ये झोपलो होतो. व रात्री १ च्या वाजेच्या दरम्यान गाढ झोप लागली असता पूजा खेडेकर ह्या कुणालाही न काही सांगता मला व माझ्या दहा वर्षाच्या मुलीला सोडून निघून गेल्या. आजूबाजूला व नातेवाईकांकडे शोध घेतला असता त्या कुठेही सापडल्या नाही. त्यांच्या डाव्या हाताच्या मनगटावर dnyanu असे गोंदले असून. या वर्णनाची विवाहिता आढळल्यास अंधेरा पोलीस स्टेशन चे जमादार विकास पाटील किंवा बीट जमादार कैलास उगले यांच्याशी 8830265214 संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.