बँक ऑफ महाराष्ट्र चा ९० वा वर्धापन दिन साजरा.

 

 

वाशीम जिल्हा प्रतिनिधी/ नारायण आरु पाटील

 

बँक ऑफ महाराष्ट्र (bank of Maharashtra) महाराष्ट्रातील अग्रगण्य ब‌ॅक ग्राहकांच्या सेवेसाठी शाखा असून महाराष्ट्रातील प्रत्येक शाखेत बँकेचा ९० वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. आजपर्यंत ९० वर्षे व्यवसायात येऊन झाली या बँकेने ग्राहकाचे नेहमी हितच जोपासले असून या बँकेत जास्तीत जास्त ग्राहक खाते काढण्यासाठी झुंबड करत असतात.

 

 

बँक ऑफ महाराष्ट्र तशी सेवा देत असते त्यानिमित्त १८ सप्टेंबर रोजी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा रिठद चे प्रबंधक श्री अवचार साहेब यांनी बँकेच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांना वर्धापनदिनी आमंत्रित केले होते व ग्राहकांच्या हस्ते केक कापून मिठाई वाटून बँकेचा ९० वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. ९० व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व ग्राहकांनी समाधान मानले.व सेवेप्रती आभार मानले.याप्रसंगी बॅकेचे सर्वच सहकारी/कर्मचारी उपस्थित होते.