anil bonde vs rahul gandhi : राहुल गांधींच्या जिभेला चटके द्या ; अनिल बोंडेच खळबळजनक वक्तव्य ! लोकसभेचे विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे नेते राहुल गांधी rahul gandhi बद्दल बोलताना अनिल बोंडे anil bonde यांनी हे विधान केल्याची माहिती व्हायरल झाल्यानंतर बुधवारी काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधात तक्रार दिल्यानंतर येथील राजापेठ पोलिसांनी बोंडे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला. काँग्रेस गुरुवारी रस्त्यावर उतरून राज्यभर आंदोलन करणार आहे.
बोंडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, या मागणीसाठी खासदार बळवंत वानखडे balavant wankhede व आ. यशोमती ठाकूर yashomati thakur यांनी पोलिस आयुक्त कार्यालयात चार तास ठिय्या दिला. त्यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष हरिश ऊर्फ भैया मुरलीधर पवार यांनी राजापेठ पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. युवक ‘काँग्रेसने’ बोंडे यांच्या राजापेठस्थित घरासमोर निदर्शने केली. राजापेठ ठाण्यातील उपनिरीक्षक प्रकाश जगताप यांनी दुपारी भादंवि कलम १९२ (दंगल घडविण्याच्या हेतूने चिथावणी देणे), ३५१ (२) (गुन्हेगारी धमकी) व ३५६ (२) (मानहानी) अन्वये गुन्हा नोंदविला. गांधी यांच्याबाबत द्वेष निर्माण होईल, त्यांच्यावर हल्ला व्हावा व दंगली घडाव्यात, अशा हेतूने डॉ. बोंडे यांनी लोकांना प्रोत्साहित केल्याचे पवार यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष काँग्रेस
राहुल गांधींवर rahul gandhi बोलण्याची बोंडेची लायकी नाही, ते काही विद्वान नाहीत, त्यांना मंत्रिपद, खासदारकी कशी मिळाली हे आम्हाला माहीत आहे, योग्य वेळ आल्यावर तेही जाहीर करू, काँग्रेस पक्ष गुरुवारी राज्यभर रस्त्यावर उतरून आंदोलन करेल.