हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

अजिंठा-बुलढाणा रोडवर अल्टो कारमधून 120 किलो गोवंश मासाचा मोठा साठा जप्त; पारध पोलिसांची धडाकेबाज कारवाई.

On: December 3, 2025 9:50 PM
Follow Us:
अजिंठा बुलढाणा रोडवर अल्टो कारमधून 120 किलो गोवंश मास जप्त
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

 

संजीव पाटील /प्रतिनिधी 

अजिंठा-बुलढाणा रोड वर आज पहाटे मोठी कारवाई झाली. अजिंठा-बुलढाणा रोड परिसरात पारध पोलिसांनी अल्टो कार अडवून त्यामधील 120 किलो गोवंश मास जप्त केले. या कारवाईत अजिंठा-बुलढाणा रोड मार्गावर अवैधरीत्या वाहतूक करणारे दोघे आरोपी पकडले गेले. 

भोकरदन तालुक्यातील वाल–सांवगी फाट्याजवळ आज रविवार 30 नोव्हेंबर रोजी सकाळी 5.50 वाजता पारध पोलिसांनी ही मोठी कारवाई केली. अल्टो कार (Maruti Suzuki Alto) मधून गोवंश जातीचे मास विनापरवाना अवैधरीत्या वाहतूक केल्याची माहिती मिळताच पोलीस पथकाने त्वरित कार थांबवून तपास केला.

आझम शेख कादर (रा. मोताळा, जिल्हा बुलढाणा) आणि तोफिक खलील कुरेशी (रा. शिवना, जिल्हा छत्रपती संभाजीनगर) हे दोघे जण अवैध विक्रीसाठी हा साठा नेत असल्याचे समोर आले. एकूण 120 किलो वजनाचे, 60,000 रुपयांचे गोवंश जातीचे मास आणि 1,80,000 रुपयांची अल्टो कार मिळून 2,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी गु.र.न. 291/2025 नुसार कलम 325 BNS 2023 सह कलम 5(c), 9 महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पो.काे. संतोष गुलाब जाधव यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला.

या संपूर्ण कारवाईत पो. काे. सुनील सुखदेव जाधव, संतोष गुलाब जाधव आणि सहाय्यक फौजदार जायभाये यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.


🔴 ताज्या अपडेटसाठी KattaNews.in ला भेट द्या

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment