Agniveer : माजी अग्निवीरांना केंद्रीय दलात CISF,BSF व RPF, मध्ये 10% आरक्षण.

 

Agniveer
Agniveer

 

 

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF), सीमा सुरक्षा दल (BSF), रेल्वे सुरक्षा दल (RPF) या केंद्रीय दलांच्या भरतीत माजी अग्निवीरांसाठी (Agniveer) १० टक्के आरक्षण ठेवण्यात येणार आहेत. ही माहिती आरपीएफचे महासंचालक मनोज यादव यांनी गुरुवारी दिली.त्यांनी पत्रकारांना सांगितले की, आरपीएफमध्ये कॉन्स्टेबल पदासाठी होणाऱ्या भरतीत यापुढे माजी अग्निवीरांसाठी १० टक्के आरक्षण ठेवण्यात येणार आहे. आरपीएफमध्ये माजी अग्निवीरांचा समावेश झाल्याने हे दल अधिक सुसज्ज व समर्थ होणार आहे.

 

 

CISF,BSF,RPF मध्ये  10% आरक्षण.

 

सीआयएसएफ या केंद्रीय दलाच्या महासंचालक नीना सिंह यांनी सांगितले की, माजी अग्निवीरांसाठी सीआयएसएफमध्ये देखील १० टक्के आरक्षण ठेवण्यात येणार आहे. तसेच शारीरिक कार्यक्षमता चाचणीमध्ये काही सवलती दिल्या जातील. बीएसएफचे महासंचालक नितीन अग्रवाल यांनी सांगितले की, बीएसएफच्या भरतीमध्येही माजी अग्निवीरांना १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय झाला आहे.