हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

Buldhana News : सहकार क्षेत्रात मोठी खळबळ! बुलडाण्यातील १३ पतसंस्थांचे परवाने रद्द होण्याच्या मार्गावर; सभासदांच्या ठेवींवर काय परिणाम होणार?

On: January 7, 2026 7:08 PM
Follow Us:
Buldhana News बुलडाणा जिल्ह्यातील १३ सहकारी पतसंस्थांचे परवाने रद्द होण्याच्या मार्गावर
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

बुलडाणा : विशाल गवई|कट्टा न्यूज नेटवर्क 

(Buldhana News)  बुलडाणा जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात खळबळ उडवणारी मोठी कारवाई समोर आली आहे. Buldhana News नुसार, आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे डबघाईस आलेल्या आणि दीर्घकाळापासून निष्क्रिय असलेल्या १३ सहकारी पतसंस्थांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्याची अंतिम प्रक्रिया सहकार विभागाने सुरू केली आहे. या निर्णयामुळे (Buldhana News) सहकार क्षेत्रात शिस्त लावण्याचा ठाम संदेश देण्यात आला आहे.

बुलडाणा जिल्ह्यात अनेक सहकारी पतसंस्था वर्षानुवर्षे तोट्यात असून, ठेवीदारांचे पैसे परत न मिळाल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर सहकार विभागाने या संस्थांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे.

या १३ पतसंस्थांवर यापूर्वीच लिक्विडेटरची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या मालमत्ता, देणी-घेणी, वसुली व आर्थिक व्यवहारांची सखोल तपासणी पूर्ण झाली असून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० आणि नियम १९६१ अंतर्गत अंतिम नोटीस बजावण्यात आली आहे.

कारवाईच्या कचाट्यात आलेल्या १३ सहकारी पतसंस्थांची यादी :

१) विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्था, बुलडाणा
२) विदर्भ नागरी सहकारी पतसंस्था, बुलडाणा
३) धनलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था, बुलडाणा
४) प्रियदर्शिनी महिला नागरी सहकारी पतसंस्था, बुलडाणा
५) लोककल्याणी महिला नागरी सहकारी पतसंस्था, बुलडाणा
६) पिपल्स अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी, बुलडाणा
७) अहिल्या पगारदार सेवकांची सहकारी पतसंस्था, बुलडाणा
८) शिवप्रताप ग्रामीण बिगरशेती पतसंस्था, बुलडाणा
९) सन्मित्र शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्था, बुलडाणा
१०) जि.प. माध्यमिक शिक्षक व कर्मचारी पतसंस्था, बुलडाणा
११) भाग्योदय ग्रामीण बिगरशेती पतसंस्था, देऊळघाट
१२) कामेश्वर ग्रामीण बिगरशेती पतसंस्था, वरवंड
१३) म. ज्योतिबा फुले ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, रायपूर

नोंदणी रद्द झाल्यानंतर या संस्थांची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होणार असून, ठेवीदारांच्या पैशांची वसुली आणि मालमत्ता विक्रीची प्रक्रिया अधिक वेगाने राबवता येणार आहे. त्यामुळे सभासदांच्या हिताचे संरक्षण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सहकार विभागाच्या या निर्णायक भूमिकेमुळे भविष्यात आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्या आणि निष्क्रिय पतसंस्थांवर आळा बसणार असल्याचा विश्वास व्यक्त होत आहे.

👉 बुलडाणा जिल्ह्यातील अशाच विश्वासार्ह, वेगवान आणि प्रभावी बातम्यांसाठी Kattanews.in ला दररोज भेट द्या.

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

मलकापूर पांगरा येथे ट्रॅक्टर अपघातात युवकाचा मृत्यू

मलकापूर पांगरा येथे भीषण अपघात! धावत्या ट्रॅक्टरवरून तोल जाऊन युवक चाकाखाली; मदत मिळण्याआधीच मृत्यू?

सिंदखेडराजा येथे प्रशिक्षणादरम्यान उपाशी राहिलेल्या आशा सेविकांचे आंदोलन

सिंदखेडराजात प्रशासनाचा गोंधळ! प्रशिक्षणात शेकडो आशा सेविका उपाशी; एक सेविका बेशुद्ध पडून हात फ्रॅक्चर

मोताळा येथे क्रेन ऑपरेटरचा संशयास्पद मृत्यू, हातावर लिहिलेला शेवटचा संदेश

मोताळ्यात हृदयद्रावक घटना! क्रेन ऑपरेटरने घेतला टोकाचा निर्णय; हातावर लिहिलेला शेवटचा संदेश वाचून धक्का

Buldhana district gram panchayat by election 59 villages voting on 28 April 2026

बुलढाणा जिल्ह्यात 59 ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणुका जाहीर; 28 एप्रिलला मतदान, 17 मार्चपासून आचारसंहिता लागू

Mehkar Nagar Parishad court notice over construction despite ban order

मनाई हुकूम असतानाही बांधकाम; मेहकर नगरपालिकेचे मुख्याधिकारी व ठाणेदारांना कोर्टाची नोटीस

Maharashtra government decision to sell kerosene at petrol pumps due to LPG gas shortage

गॅस टंचाईमुळे मोठा निर्णय! आता पेट्रोल पंपांवर ‘केरोसीन’ मिळणार; विधानसभेत छगन भुजबळांची घोषणा

Leave a Comment