ladki bahin yojana : सावधान ! योजनेच्या नावाखाली दस्तऐवज गोळा करून अनेकींना गंडा ; दरुपयोग होण्याची भीती

ladki bahin yojana

ladki bahin yojana : लाडकी बहीण योजना ladki bahin yojana जाहीर झाली तेव्हापासून बहिणींची धडपड सुरू असतानाच, सुरुवातीला त्यांच्याकडून अवाच्या सव्वा पैसे घेतल्या जात असल्याचे समोर आले. त्यानंतर आता बहिणींचे आधार कार्ड आणि इतर कागदपत्रे घेत, त्यांचा दुरुपयोग करणारी टोळीच खामगाव khamgaon आणि परिसरात सक्रिय झाल्याचे समोर येत आहे. काही बहिणींना या माध्यमातून गंडविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार खामगाव तालुक्यात उघडकीस आला.

 

 

 

 

त्यामुळे बहिणींनी वेळीच सावध होण्याची आवश्यकता आहे. मुख्यमंत्री माझी ‘लाडकी बहीण’ ही योजना जाहीर झाल्यापासूनच विविध कागदपत्रे तयार करण्यासाठी बहिणींची गावोगावी लगबग सुरू आहे. काही ठिकाणी जावईबुवांच्या देखीलसासुरवाडीतील फेऱ्या आणि मुक्काम वाढला आहे. दरम्यान, बहिणींकडून आधार कार्ड, टीसी आणि इतर साहित्य घेऊन त्यांच्या कागदपत्रांचा दुरुपयोग केल्या जात असल्याच्या तक्रारी वाढीस लागल्या आहेत.त्यामुळे शेती आणि इतर कामे सोडून बहिणींचा सुरू असलेला खटाटोप व्यर्थ जात असल्याचे काहीप्रकार समोर आले आहेत.

 

 

 

 

अनेक गावांतून गोळा केली कागदपत्रे कागदपत्रे गोळा करण्यासाठी बहिणींना येत असलेली तांत्रिक अडचण लक्षात घेऊन तालुका आणि परिसरात सर्वच कागदपत्रे तयार करून देण्याऱ्या टोळी सक्रिय झाल्या आहेत. या टोळींकडून आता या कागदपत्रांचा दुरुपयोग केल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. संबंधितांच्या मोबाइल नंबरशिवाय या बहिणींकडे कोणताही पुरावा नसल्याने, दलालांना शोधावे तरी कुठे, असा प्रश्न आता अनेक बहिणींना पडला आहे.

 

 

 

एजंटकडून फसवणूक

■ बहिणींची अडचण लक्षात घेता, निकडीनुसार सेवा देण्याचाबहाणा करून काही बहिणींची एजंटांकडून फसवणूक करण्यात आल्याच्या तक्रारी वाढीस लागल्या आहेत.

■ खामगाव तालुक्यात महिला बचत गटातील महिलांची कागदपत्रे गोळा करून त्यांच्या संमतीशिवाय कर्ज घेतल्याचेही प्रकरण गाजले आहे. खामगाव तालुक्यातील घाटपुरी येथे गत वर्षी फसवणुकीची तक्रारही दाखल केली होती. या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हाही दाखल झाला होता. हे येथे विशेष. योजनेसाठी कागदपत्रे तयार करण्यासाठी गावात आलेल्या एकाला आधार कार्ड आणि इतर कागदपत्रे दिली. आता त्या व्यक्तीचा फोन लागत नाही. त्यामुळे चिंता वाढली आहे.