हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

देवदर्शनासाठी निघाले, पण परतले नाहीत! अपघातात आतेभाऊ व मामेबहीण ठार

On: January 5, 2026 8:38 AM
Follow Us:
देवदर्शनासाठी निघाले, पण परतले नाहीत… नाशिक डंपर अपघातात आतेभाऊ व मामेबहीण ठार
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

कट्टा न्यूज नेटवर्क/विशाल गवई 

देवदर्शनासाठी निघाले, पण परतले नाहीत… ही हळहळजनक घटना नाशिकमध्ये घडलेल्या भीषण डंपर अपघातात समोर आली. नाशिक डंपर अपघातात बुलढाणा जिल्ह्यातील पांगरी उंबरहांडे येथील युवक आणि अंत्री खेडेकर येथील मामेबहीण यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. देवदर्शनाच्या उद्देशाने घरातून निघालेल्या या दोघांवर अचानक काळाने घाला घातला. नाशिक-त्र्यंबकेश्वर महामार्गावर झालेल्या या अपघातामुळे नाशिक डंपर अपघाताची तीव्रता पुन्हा अधोरेखित झाली असून पांगरी उंबरहांडे व अंत्री खेडेकर गावांवर शोककळा पसरली आहे.
—————————————-
नाशिकमध्ये काळाचा घाला! डंपर अपघातात बुलढाणा जिल्ह्यातील पांगरी येथील युवक व अंत्री खेडेकर येथील युवती ठार .
ही घटना नाशिक-त्र्यंबकेश्वर महामार्गावर भारत पेट्रोलियम पंपाजवळ घडली.रस्ते काम सुरू असताना झालेल्या  अपघात मध्ये दुचाकीवरील बुलढाणा जिल्ह्यातील पांगरी उंबरहांडे व अंत्री खेडेकर येथील रहिवासी युवक व युवतीचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या भीषण नाशिक डंपर अपघात मुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.या अपघातात शिवम राजेश उंबरहांडे (वय २२, रा. पांगरी उंबरहांडे, जि. बुलढाणा, सध्या रा. सातपूर, नाशिक)
आणि भूमिका समाधान खेडेकर (वय २१, रा. अंत्री खेडेकर, जि. बुलढाणा, सध्या रा. सातपूर, नाशिक)
यांचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक-त्र्यंबकेश्वर महामार्गाचे काम सध्या सुरू असून डंपर मटेरियल घेऊन
त्र्यंबकेश्वरच्या दिशेने जात होता. भारत पेट्रोलियम पंपाजवळ डंपर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले.
समोरून येणाऱ्या छोटा हत्ती वाहनास वाचवण्याच्या प्रयत्नात डंपर पलटी झाला.

त्याचवेळी त्र्यंबकेश्वरहून नाशिकच्या दिशेने येणारी दुचाकी डंपरखाली दबली गेली.
या भीषण अपघातात दुचाकीस्वार युवक व युवती गंभीर जखमी झाले.
त्यांना तत्काळ त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

हे पण वाचा..

मतदानाआधीच मोठा राजकीय धक्का! 29 महानगरपालिकांमध्ये 65 नगरसेवक बिनविरोध.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
मृतांच्या नातेवाईकांनीही घटनास्थळी गर्दी केली.
डंपर चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.

हे पण वाचा..

अखेर कारवाई! शिंदी येथील तत्कालीन ग्रामसेवक दिनकर काळे निलंबित — महिलांशी गैरवर्तन व धमकी प्रकरण.


👉 अशाच ताज्या व विश्वासार्ह बातम्यांसाठी

बुलढाणा, वाशिम, जालना आणि महाराष्ट्रातील सर्व ब्रेकिंग न्यूज सर्वात आधी वाचण्यासाठी
Kattanews.in ला नियमित भेट द्या.
आपल्या मित्रांनाही ही बातमी शेअर करा.


🔗 संबंधित बातम्या

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment