हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

वाशिमचा ‘किन्हीराजा’ ठरणार आदर्श दत्तकगाव! जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकरांचा सर्वांगीण विकासाचा मास्टरप्लॅन

On: January 3, 2026 8:25 AM
Follow Us:
वाशिम जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी किन्हीराजा दत्तकगाव विकास अंतर्गत मनरेगा प्रकल्पांची पाहणी करताना

वाशिम प्रतिनिधी : नारायणराव आरू पाटील

वाशिम जिल्ह्यातील किन्हीराजा दत्तकगाव विकास हा केवळ रोजगारनिर्मितीपुरता मर्यादित न राहता जलसंधारण, पर्यावरण संवर्धन आणि पर्यटन विकासाचा आदर्श नमुना ठरणार आहे.
किन्हीराजा दत्तकगाव विकास आराखड्यांतर्गत मनरेगाच्या माध्यमातून गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी एकात्मिक नियोजन करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.
किन्हीराजा दत्तकगाव विकास हा दीर्घकालीन व शाश्वत विकासाचा मॉडेल प्रकल्प ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत प्रस्तावित विकासकामांची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी किन्हीराजा परिसरात सविस्तर शिवार फेरी केली.
या फेरीदरम्यान त्यांनी मोठा तलाव, पौराणिक महत्त्व असलेला छोटा तलाव, डॉ. सलीम अली कॅम्प, काटेपूर्णा अभयारण्य, सोनल धरण परिसरातील ई-क्लास जमीन तसेच समृद्धी महामार्गालगतच्या भागाची पाहणी केली.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

या नैसर्गिक संसाधनांचा शाश्वत वापर करून पर्यटन विकास, जंगल सफारी, फळबाग लागवड, रेशीम उद्योग, शेततळे निर्मिती, बांबुवन विकास, तलाव सौंदर्यीकरण तसेच समृद्धी महामार्गावरील प्रवाशांसाठी माहिती फलक व दिशादर्शक सुविधा उभारण्याबाबत विविध संकल्पना मांडण्यात आल्या.

या उपक्रमांमुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून गावाच्या आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे.
किन्हीराजा गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी संपूर्ण गावाचा नियोजनबद्ध आणि दूरदृष्टीपूर्ण विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी सर्व विभागांना दिले.

या शिवार फेरीदरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान, उपवनसंरक्षक अभिजीत वायकोस, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आत्माराम बोंद्रे, तहसीलदार दीपक पुंडे, गटविकास अधिकारी आकाश वर्मा यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

हे पण वाचा..

पांदण रस्ते शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय; मार्गी लावण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा – आमदार अमित झनक.

मनरेगा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या कामांमुळे जलसंधारण, पर्यावरण संरक्षण, पर्यटन विकास आणि रोजगारनिर्मिती हे सर्व उद्दिष्टे एकाच वेळी साध्य होतील आणि विकसित किन्हीराजा हे दत्तकगाव प्रकल्पातील आदर्श गाव म्हणून उभे राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.


📢 वाचकांसाठी आवाहन

अशाच महत्त्वाच्या प्रशासन, विकास व जिल्हास्तरीय बातम्यांसाठी
Kattanews.in ला नियमित भेट द्या, आमचा WhatsApp अपडेट जॉइन करा आणि बातमी शेअर करा.


🔗 हे पण वाचा..

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment