संजीव पाटील/भोकरदन
भोकरदन तालुक्यात सध्या बुलढाणा अर्बन हा विषय चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.बुलढाणा अर्बन पतसंस्था लवकरच बंद पडणार असल्याची अफवा पसरल्याने
बुलढाणा अर्बन शाखेत गेल्या दोन दिवसांपासून मोठी गर्दी उसळली आहे.
आपले तारण असलेले सोने व ठेवी सुरक्षित राहाव्यात, या भीतीने नागरिकांनी
बुलढाणा अर्बन पतसंस्थेकडे धाव घेतली असून शाखेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, ही अफवा बीड जिल्ह्यातून सुरू झाली असून सोशल मीडियामुळे ती वेगाने भोकरदनपर्यंत पोहोचली.
सध्या सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने, तारण ठेवलेले सोने सुरक्षित राहावे
या उद्देशाने अनेक खातेदार एकाच वेळी बँकेत दाखल झाले आहेत.भोकरदन तालुक्यात यापूर्वी ज्ञानराधा, रायसोनी आणि मलकापूर अर्बन बँकांमध्ये
झालेल्या आर्थिक अडचणींमुळे अनेकांचे पैसे अडकल्याच्या घटना घडल्या आहेत.
त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक अफवांवर लवकर विश्वास ठेवत असून,
“आधी माझे पैसे द्या, मग इतरांचे” अशी मागणी करत शाखेत रेटारेटी सुरू आहे.या अचानक वाढलेल्या गर्दीमुळे बँक कर्मचारी अडचणीत आले असून,
व्यवहार सुरळीत ठेवण्यासाठी मोठा ताण सहन करावा लागत आहे.
शाखाधिकाऱ्यांचा खुलासा: बुलढाणा अर्बन पूर्णपणे सुरक्षित
भोकरदन शाखेचे शाखाधिकारी दिलीप ताठे यांनी सर्व अफवांचे खंडन केले आहे.
ते म्हणाले की, बुलढाणा अर्बनची आर्थिक स्थिती मजबूत असून घाबरण्याचे कोणतेही कारण नाही.
नागरिकांनी आपले तारण सोने परत नेले आहे.आमच्या शाखेत तब्बल 15 कोटी रुपयांचे सोने तारण कर्ज वाटप केले आहे तसेच राखी मध्ये तीस कोटी रुपये डिपॉझिट आहेत अकरा हजार पाचशे आमचे खातेदार आहे, सदर सोने हे भोकरदन येथील शाखेतच आहे, त्यामुळे ग्राहकांनी घाबरून जाऊ नये, 1 जानेवारी 1 कोठी 25 लाख रुपयांचा भरणा करून सोने परत नेले आहे, तर २ जानेवारी रोजी दोन कोटी 20 लाख रुपये भरून ग्राहकांनी सोने परत नेले आहे
सध्या शाखेत एकूण १६ कोटी रुपयांचे सोने तारण असून ते पूर्णपणे सुरक्षित आहे.
एकाच वेळी मोठ्या प्रमाणात खातेदार आल्यामुळे कामावर ताण येत असला,
तरी सर्व व्यवहार नियमानुसार सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हे पण वाचा..
भाजपात अंतर्गत स्फोट! निष्ठावान देशपांडेंचाच गेम; उपाध्यक्ष पदावरून काढले.
नागरिकांमध्ये भीती का?
मागील काही दिवसांत विविध पतसंस्था व बँकांमध्ये झालेल्या घोटाळ्यांमुळे
ग्रामीण भागातील नागरिकांच्या मनात भीतीचे सावट आहे.
त्याच पार्श्वभूमीवर बुलढाणा अर्बन पतसंस्थेत ही गर्दी पाहायला मिळत आहे.
👉 अशाच विश्वासार्ह आणि ताज्या स्थानिक बातम्यांसाठी Kattanews.in वाचत राहा
तुमच्या परिसरातील प्रत्येक महत्वाची अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी
आमच्या वेबसाइटला दररोज भेट द्या.










