हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

नोकरीच्या नावाखाली दीड लाखांची फसवणूक; बुलढाण्यात सेवानिवृत्त नागरिकाची आर्थिक लूट

On: December 22, 2025 9:23 AM
Follow Us:
नोकरीच्या नावाखाली दीड लाखांची फसवणूक बुलढाणा सेवानिवृत्त नागरिक

बुलढाणा प्रतिनिधी/भागवत गायकवाड

नोकरी मिळवून देण्याच्या आमिषाला बळी पडत बुलढाणा तालुक्यातील एका सेवानिवृत्त नागरिकाची नोकरी फसवणूक करत दीड लाख रुपयांची आर्थिक लूट झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. बुलढाणा फसवणूक प्रकरण म्हणून चर्चेत आलेल्या या घटनेत बनावट नियुक्तिपत्र देत अकोल्यातील युवकाने पैसे उकळल्याचे स्पष्ट झाले आहे.

सुंदरखेड येथील रहिवासी विलास हरिभाऊ मानवतकर (वय ६०) यांनी बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, मार्च २०२४ मध्ये आरोपी अंकित (अनिकेत) किरण मोहोड (रा. अकोला) याने आयुष्मान भारत मिशन अंतर्गत खासगी तत्त्वावर आरोग्य सेवक पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. नोकरी फसवणूक प्रकरणात विश्वास संपादन करत आरोपीने मानवतकर यांचा मुलगा अमित याची शैक्षणिक कागदपत्रे स्वतःकडे घेतली.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

सुरुवातीला आरोपीने नोकरीसाठी तब्बल १० लाख रुपयांची मागणी केली होती. तडजोडीनंतर नियुक्तिपत्र मिळाल्यानंतर उर्वरित रक्कम देण्याचे ठरले. त्यानुसार ८ आणि १५ मार्च रोजी फोन पेच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने एकूण १ लाख ५० हजार रुपये आरोपीच्या खात्यावर पाठविण्यात आले.

मात्र, २७ मार्च रोजी संबंधित कार्यालयात चौकशी केल्यानंतर देण्यात आलेले नियुक्तिपत्र पूर्णपणे बनावट असल्याचे उघड झाले. यानंतर रक्कम परत मागितली असता आरोपीने वेळकाढूपणा करत अखेर संपर्क तोडला. त्यामुळे सेवानिवृत्त नागरिकाची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले.

या नोकरी फसवणूक बुलढाणा प्रकरणी आरोपीविरुद्ध फसवणूक व बनावट दस्तऐवज तयार केल्याच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शशिकांत धारकरी करीत आहेत.

👉 हे पण वाचा…

👉 हे पण वाचा..

अशा प्रकारच्या फसवणुकीपासून स्वतःचा आणि कुटुंबाचा बचाव करण्यासाठी KattaNews.in फॉलो करा. सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्याशी जोडलेले रहा.

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

मेहकर न्यायालयातील बेलिफ 10 हजारांची लाच घेताना ACBच्या जाळ्यात

न्याय देणाऱ्यांच्या दारातच भ्रष्टाचार! मेहकर न्यायालयात खळबळ; वॉरंट थांबवण्यासाठी बेलिफ 10 हजारांची लाच घेताना ACBच्या जाळ्यात

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा लागू झाल्यानंतरची माहिती

राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर महाराष्ट्रात धर्मस्वातंत्र्य कायदा लागू; बळजबरीच्या धर्मांतरावर 7 वर्षांपर्यंत शिक्षा, जाणून घ्या काय आहेत नव्या तरतुदी

पाडळी शिंदे येथे करंटने बकरी ठार झाल्याच्या वादातून झालेल्या खूनप्रकरणानंतर घटनास्थळी जमलेले ग्रामस्थ

करंटने बकरी ठार झाल्याच्या वादातून ५५ वर्षीय व्यक्तीचा खून; अंढेरा पोलिसांनी अवघ्या दोन तासांत दोन आरोपींना केली अटक

मर्दडी देवी मंदिर चोरी प्रकरणात CCTV फुटेजच्या आधारे पोलिसांचा तपास

देवीसमोर हात जोडले, नंतर त्याच गाभाऱ्यात चोरी केली! मर्दडीच्या जागृत देवस्थानातील धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद

चौथा ग्रामपंचायतीने स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालयाला अभ्यासिकेसाठी सभागृह सुपूर्द

चौथा ग्रामपंचायतीचा विद्यार्थीहिताचा निर्णय; कार्यालयाचे सभागृह वाचनालयाला सुपूर्द, अभ्यासिकेची झाली सुरुवात

बुलढाण्यासह विदर्भातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट; पुढील पाच दिवस पावसाचा इशारा

बुलढाण्यासह विदर्भातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट; पुढील पाच दिवस मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि जोरदार पावसाचा इशारा

Leave a Comment