हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

वाशिम नगरपरिषद निवडणूक 2025: रिसोड शहरातील प्रमुख मार्गांवर वाहतूक पूर्णपणे बंद – प्रशासनाचा मोठा निर्णय.

On: December 20, 2025 6:35 AM
Follow Us:
वाशिम नगरपरिषद निवडणूक 2025: रिसोड शहरातील प्रमुख मार्गांवर वाहतूक पूर्णपणे बंद

रिसोड | प्रतिनिधी/विजय जुंजारे 

वाशिम नगरपरिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी रिसोड शहरात वाहतूक बंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
Washim Nagar Parishad Election 2025 अंतर्गत होणाऱ्या मतमोजणीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी Risod traffic ban लागू करण्यात आला आहे.

दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 6.00 वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत रिसोड शहरातील काही प्रमुख मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहणार आहेत.
हे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी वाशिम यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 33 (1)(ब) अंतर्गत निर्गमित केले आहेत.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

निवडणूक निर्णय अधिकारी (नगरपरिषद निवडणूक 2025), तहसीलदार रिसोड तसेच पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन रिसोड यांच्या पत्रांच्या अनुषंगाने हे आदेश जारी करण्यात आले आहेत.
मतमोजणीदरम्यान सिव्हिल लाईन परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहनांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

🚧 वाहतूक बंद असलेले मार्ग

  • गणेश मेडिकल ते सोसायटी पेट्रोल पंप – सिव्हिल लाईन, रिसोड
  • साई हॉटेल ते बसस्टँड – सिव्हिल लाईन, रिसोड रोड

🔁 पर्यायी वाहतूक मार्ग

  • पेट्रोल पंपाकडून येणारी वाहने लोगी रोडकडे वळवण्यात येणार
  • साई हॉटेलकडून येणारी वाहने वाशिम नाका मार्गे रिसोड–लोणी रोडने जाण्याचे आवाहन

सदर आदेशाची अंमलबजावणी पोलीस अधिकारी व वाहतूक शाखेकडून काटेकोरपणे करण्यात येणार असून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

हा आदेश 18 डिसेंबर 2025 रोजी निर्गमित करण्यात आला असून, त्याची प्रसिद्धी नोटीस बोर्ड व सार्वजनिक ठिकाणी फलक लावून करण्यात येणार आहे.


📢 महत्त्वाच्या स्थानिक बातम्यांसाठी आमच्याशी जोडले रहा

वाशिम, रिसोड आणि परिसरातील निवडणूक, प्रशासन, अपघात व ब्रेकिंग न्यूज सर्वात आधी व अचूक वाचण्यासाठी
Kattanews.in ला दररोज भेट द्या.


📰 Related News

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment