हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

पतंगाच्या मांजामुळे गळा चिरला; वडगाव वाणमध्ये बांधकाम मिस्त्रीला १८ टाके.

On: December 18, 2025 8:42 AM
Follow Us:
वडगाव वाण येथे पतंगाच्या नायलॉन मांजामुळे बांधकाम मिस्त्री गंभीर जखमी

प्रतिभा जगदने/कट्टा न्यूज 

वडगाव वाण येथे पतंगाच्या मांजामुळे गळा चिरल्याची धक्कादायक घटना १६ डिसेंबर रोजी सायंकाळी घडली. या घटनेत एका बांधकाम मिस्त्रीला नायलॉन मांजामुळे गंभीर दुखापत झाली असून त्यांच्या गळ्याला तब्बल १८ टाके पडले आहेत. पतंगाचा घातक मांजा मानवी जीवासाठी किती धोकादायक आहे, हे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

संग्रामपूर तालुक्यातील पलसीपूरा येथील रहिवासी शेख अनिस शेख गफ्फार हे बांधकाम मिस्त्री दानापूर येथे काम आटोपून आपल्या गावाकडे परतत होते. वडगाव वाण गावातून जात असताना अचानक रस्त्यावर अडकलेल्या नायलॉन मांजाने त्यांच्या गळ्याला चिरले.

गळ्याला खोल जखम झाल्याने शेख अनिस गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने वरवट बकाल येथे प्राथमिक उपचार देण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना अकोला येथे हलविण्यात आले. अकोला येथील रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून गळ्याच्या आतून व बाहेरून एकूण १८ टाके पडले आहेत.

नायलॉन मांजा हा केवळ माणसांसाठीच नव्हे, तर पशू आणि पक्ष्यांसाठीही अत्यंत घातक आहे. मात्र, असे असतानाही पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर सर्रास केला जात आहे. काही ठिकाणी कोणतीही भीती न बाळगता राजरोसपणे नायलॉन मांजाची विक्री सुरू असल्याचे चित्र आहे.

या घटनेनंतर नागरिकांमधून मांजा विक्रेत्यांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, प्रशासनाने नायलॉन मांजाविरोधात कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

📢 आपली प्रतिक्रिया नोंदवा

नायलॉन मांजावर बंदी असूनही विक्री सुरू आहे. तुमच्या भागातही अशी समस्या आहे का? खाली comment करून आम्हाला कळवा.

Kattanews.in ला Follow करा — विश्वासार्ह, वेगवान आणि लोकांच्या आवाजाची बातमी!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

जिल्हा परिषद शाळा शिक्षक मोबाइलवर ऑनलाइन पोर्टलची माहिती भरताना

जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी कमी, पण ऑनलाइन उपक्रमांचा भडीमार! ६८ कामांच्या यादीने शिक्षकांची दमछाक; मुलांना शिकवायला वेळ कधी मिळणार?

जळगाव जामोद विद्यार्थिनी मृत्यू घटनेनंतर रामनगर परिसरात शोककळा

दहावीच्या वर्गातून आयुष्याच्या वाटेवर जाण्याआधीच जयश्रीचा प्रवास थांबला; अवघ्या १५व्या वर्षी मृत्यू, ‘नेमकं काय घडलं?’

राहुल बोंद्रे भाजपप्रवेश जाहीर करताना चिखलीचे माजी आमदार

चिखलीच्या राजकारणात ‘नवी वाट, नवा अध्याय’; काँग्रेसला रामराम ठोकत राहुल बोंद्रे यांचा भाजपप्रवेश निश्चित, २२ सप्टेंबरला मुंबईत होणार पक्षप्रवेश

सिंदखेड राजा रुग्णालय श्रेणीवर्धन: १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी जागेचा प्रश्न कायम

सिंदखेड राजा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन अडीच वर्षांपासून कागदावरच! जागेचा प्रश्न कायम; आडगाव राजात जागा देण्याची मागणी

माँ कमळजा माता मंदिर परिसरात साचलेले पाणी, लोणार

मंदिरात वारंवार पाणी शिरतेय, भाविक संतप्त; माँ कमळजा माता मंदिराच्या संरक्षणासाठी लोणारमध्ये आज चक्का जाम

सिंदखेड राजा गरुड मूर्ती पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देताना विजय सोनुने आणि इतर

सिंदखेड राजा येथील गरुड मूर्ती अखेर सापडली; महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभागाच्या स्वाधीन

Leave a Comment