हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

चिखलीत नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यावर गुन्हा दाखल; मकरसंक्रांतीपूर्वी पोलिसांची धडक कारवाई

On: December 16, 2025 3:47 PM
Follow Us:
चिखलीत नायलॉन मांजा विक्रीवर पोलिसांची धडक कारवाई

चिखली प्रतिनिधी/विशाल गवई 

चिखली नायलॉन मांजा प्रकरणात मोठी कारवाई समोर आली आहे. मकरसंक्रांती सण जवळ येत असताना चिखली शहरात अवैध नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या एका इसमावर पोलीस स्टेशन चिखली येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई डी.बी. पथकाने गुप्त माहितीच्या आधारे केली असून मानवी जीवनासह पक्षी व प्राण्यांसाठी घातक ठरणाऱ्या नायलॉन मांजाविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे.दिनांक 13 डिसेंबर 2025 रोजी पोलीस स्टेशन चिखलीचे ठाणेदार भुषण गावंडे यांनी गुन्हे प्रगटीकरण विभागातील अंमलदारांना शहरात नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार डी.बी. पथक चिखली शहरात शोधमोहीम राबवत असताना गुप्त बातमीदाराकडून महत्त्वाची माहिती मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार, मानवी जिवितास तसेच पशु-पक्ष्यांच्या जिवितास गंभीर धोका निर्माण करणारा नायलॉन मांजा विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे समोर आले. या माहितीवर तत्काळ कारवाई करत डी.बी. पथकाने पोलीस स्टाफच्या मदतीने छापा टाकून शेख जहुर शेख गफुर (वय 49), रा. वार्ड क्रमांक 10, अंगुरचा मळा, चिखली, जिल्हा बुलढाणा यास जागीच ताब्यात घेतले.

आरोपीकडील कापडी पिशवीची तपासणी केली असता त्यामध्ये तीन लाल रंगाच्या नायलॉन मांजाच्या रिल आढळून आल्या. प्रत्येकी 250 रुपये किमतीच्या या रिल्सचा एकूण मुद्देमाल 750 रुपये इतका असून शासनाने नायलॉन मांजावर बंदी घातलेली असतानाही त्याची विक्री सुरू असल्याचे निष्पन्न झाले.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 125, 223 तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 5 व 15 अन्वये पोलीस स्टेशन चिखली येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाडउपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पो.नि. भुषण गावंडे यांच्या नेतृत्वाखाली डी.बी. पथकातील सफौ राजेंद्र काळे, मपोहेकॉ ललिता खरात, पोना अमोल गवई, पोकॉ प्रशांत धंदर, पोकॉ अजय इटावा, पोकॉ पंढरीनाथ मिसाळ यांनी ही कारवाई यशस्वी केली.

टीप : चिखली पोलीस स्टेशनतर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजाची विक्री किंवा वापर करू नये. नियमांचे उल्लंघन केल्यास विक्रेते व वापरकर्त्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.


👉 हे आवश्य करा..

आपल्या परिसरातील अशाच महत्त्वाच्या गुन्हेगारी, प्रशासनिक आणि स्थानिक बातम्यांसाठी Kattanews.in ला रोज भेट द्या. ही बातमी शेअर करून इतरांनाही जागरूक करा.


🔗 हे पण वाचा..

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

पालकमंत्री बेपत्ता, बुलढाण्यात शेतकऱ्यांची पोलिसांत तक्रार

पालकमंत्री बेपत्ता? ‘काजू-बदामाची व्यवस्था शेतकरी करतील, पण बांधावर तरी पाठवा’ बुलढाण्यात पोलिसांत तक्रार

राहुल बोंद्रे भाजप प्रवेश रद्द राहुल गांधी फोन कॉल बुलढाणा काँग्रेस

राहुल गांधींच्या एका फोनने फिरलं बुलढाण्यातील राजकारण! राहुल बोंद्रे यांचा भाजप प्रवेश रद्द; मध्यरात्री समर्थकांचा घराबाहेर जल्लोष

राहुल बोंद्रे भाजप प्रवेश, चिखलीचे माजी आमदार

राहुल बोंद्रे भाजप प्रवेश: पक्षप्रवेशाच्या पूर्वसंध्येला राहुल गांधींचा फोन? चिखलीच्या राजकारणात चर्चांना उधाण

वडगाव तेजन रॉबरी: सरस्वती विद्यालय परिसरात महिलेची सोन्याची पोत ओरबाडली

शाळेच्या परिसरातच महिलेच्या गळ्यातील ४ तोळे सोन्याची पोत ओरबाडली; वडगाव तेजनमध्ये दिवसाढवळ्या रॉबरी

जिल्हा परिषद शाळा शिक्षक मोबाइलवर ऑनलाइन पोर्टलची माहिती भरताना

जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी कमी, पण ऑनलाइन उपक्रमांचा भडीमार! ६८ कामांच्या यादीने शिक्षकांची दमछाक; मुलांना शिकवायला वेळ कधी मिळणार?

जळगाव जामोद विद्यार्थिनी मृत्यू घटनेनंतर रामनगर परिसरात शोककळा

दहावीच्या वर्गातून आयुष्याच्या वाटेवर जाण्याआधीच जयश्रीचा प्रवास थांबला; अवघ्या १५व्या वर्षी मृत्यू, ‘नेमकं काय घडलं?’

Leave a Comment