हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

साखरखेर्डा परिसरात चॉकलेटचे आमिष देत 14 वर्षीय मुलीवर अत्याचार; ‘भावाला मारून टाकीन’ धमकी देणाऱ्या युवकावर POCSO गुन्हा दाखल!

On: December 10, 2025 9:28 PM
Follow Us:
साखरखेर्डा बेपत्ता अल्पवयीन मुलगी प्रकरणात दोन आरोपी अटक

साखरखेर्डा/सचिन खंदारे

साखरखेर्डा (sakharkherda) पोलिस स्टेशन हद्दीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. चॉकलेटचे आमिष दाखवून आणि “तुझ्या भावाला मारून टाकेन” अशी धमकी देत 32 वर्षीय युवकाने 14 वर्षीय मुलीवर दोन वेळा अत्याचार केल्याचे निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणी साखरखेर्डा पोलिसांनी आरोपी रोहित तेजराव गवई याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा पीडितेचा नातेवाईक असून त्याने भेटवस्तू आणि चॉकलेट देत मुलीला विश्वासात घेतले. त्यानंतर साखरखेर्डा परिसरातील लव्हाळा फाटा आणि कोल्हवड परिसरात नेऊन 3 आणि 5 डिसेंबर रोजी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.घटनेची माहिती 6 डिसेंबर रोजी मुलीच्या वडिलांना मिळाल्यानंतर त्यांनी मुलीकडे चौकशी केली.

मुलीने संपूर्ण घटना सांगितल्यानंतर कुटुंबीयांनी साखरखेर्डा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली.तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी रोहित गवई याच्यावर भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 64 (फ), 65 (1), 68 (अ), 351(2), 352 तसेच POCSO कायद्याच्या कलम 3 आणि 4 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास हा साखरखेर्डा पोलिस स्टेशनचे ठाणेदार सपोनि गजानन करेवाड यांच्याकडे सुरू आहे.

सावध राहा आणि माहिती शेअर करा

जर तुम्हाला अशा घटनांविषयी अधिक माहिती हवी असेल, तर आमच्या ताज्या बातम्या विभागाला भेट द्या.
तसेच ही माहिती आपल्या मित्रपरिवारासह शेअर करा आणि समाजात जागरूकता वाढवा.

kattanews.in लाभ फॉलो करा आणि व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

संबंधित बातम्या

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

राहुल बोंद्रे भाजप प्रवेश रद्द राहुल गांधी फोन कॉल बुलढाणा काँग्रेस

राहुल गांधींच्या एका फोनने फिरलं बुलढाण्यातील राजकारण! राहुल बोंद्रे यांचा भाजप प्रवेश रद्द; मध्यरात्री समर्थकांचा घराबाहेर जल्लोष

राहुल बोंद्रे भाजप प्रवेश, चिखलीचे माजी आमदार

राहुल बोंद्रे भाजप प्रवेश: पक्षप्रवेशाच्या पूर्वसंध्येला राहुल गांधींचा फोन? चिखलीच्या राजकारणात चर्चांना उधाण

वडगाव तेजन रॉबरी: सरस्वती विद्यालय परिसरात महिलेची सोन्याची पोत ओरबाडली

शाळेच्या परिसरातच महिलेच्या गळ्यातील ४ तोळे सोन्याची पोत ओरबाडली; वडगाव तेजनमध्ये दिवसाढवळ्या रॉबरी

जिल्हा परिषद शाळा शिक्षक मोबाइलवर ऑनलाइन पोर्टलची माहिती भरताना

जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी कमी, पण ऑनलाइन उपक्रमांचा भडीमार! ६८ कामांच्या यादीने शिक्षकांची दमछाक; मुलांना शिकवायला वेळ कधी मिळणार?

जळगाव जामोद विद्यार्थिनी मृत्यू घटनेनंतर रामनगर परिसरात शोककळा

दहावीच्या वर्गातून आयुष्याच्या वाटेवर जाण्याआधीच जयश्रीचा प्रवास थांबला; अवघ्या १५व्या वर्षी मृत्यू, ‘नेमकं काय घडलं?’

राहुल बोंद्रे भाजपप्रवेश जाहीर करताना चिखलीचे माजी आमदार

चिखलीच्या राजकारणात ‘नवी वाट, नवा अध्याय’; काँग्रेसला रामराम ठोकत राहुल बोंद्रे यांचा भाजपप्रवेश निश्चित, २२ सप्टेंबरला मुंबईत होणार पक्षप्रवेश

Leave a Comment