मानोरा प्रतिनिधी/सुधीर ढगे
मानोरा — आज मानोरा येथे भव्य कॅनडल रॅली काढण्यात आली. ह्या उत्सवात हजारो नागरिक सहभागी झाले. कॅनडल रॅलीच्या प्रकाशात संपूर्ण मार्ग उजळला आणि वातावरण भावपूर्ण झाले. महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने मानोरा शहरात आयोजित करण्यात आलेल्या या कॅनडल रॅलीला या वर्षीही भरघोस प्रतिसाद मिळाला. मागील 20 वर्षांपासून आयोजित होत असलेली मानोऱ्याची ही ऐतिहासिक कॅनडल रॅली आज अधिक भव्य रुपात पार पडली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष वामनराव भगत होते तर प्रमुख पाहुणे आणि मुख्य आयोजक आयु. प्रविण आडुळे सर (पदम लोक प्रतिष्ठान) होते. आयु. बि.डी. मनवर सर (माजी शिक्षण अधिकारी), आयु. बाळासाहेब डेरे, डॉ. भिमपाल भगत, डॉ. विशाल शिरसाट, अनिल शिरसाट, सुभाष आडुळे सर यांची प्रमुख उपस्थिती होती.
धम्मपाल गाथा घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. विशाल शिरसाट यांनी केले तर सूत्रसंचालन आयु. प्रविण आडुळे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाची साथ
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंचशील भाऊ शिरसाट, अनिल शिरसाट, मिलींद मोरे, उमेश डेरे, शुभम आडुळे, जिवक वाघमारे, महेंद्र मनवर, रोशन मनवर, गणेश डेरे, विकी शिरसाट, गौतम मनवर, सुरज बडवे, प्रज्वल डेरे, दिपक शिरसाट, शेख पाशा, उमेश उमप, गोलू शिरसाट, संप्नील मोरे, सुशील कांबळे, योगेश ठोबरे, राहुल शिरसाट, अकक्ष इंगोले, गणेश मस्के, सिधु शिकारे आदींनी मोलाचे परिश्रम घेतले.
Related News
- रिसोड–मेहकर रोड कामात नियमभंग? माहितीफलक गायब, प्रवाशांचा जीव धोक्यात!
- ४१५७ शेतकऱ्यांचे अनुदान अडकले! ई-केवायसी न केल्यास रक्कम मिळणार नाही – तहसीलदारांचा तातडीचा इशारा.
- रिसोड–मेहकर रोड कामात नियमभंग? माहितीफलक गायब, प्रवाशांचा जीव धोक्यात!












