डोणगाव जवळील अंजनी बु शिवारात शेतात लोंबकळलेल्या वीज तारेने शेतकऱ्याचा मृत्यू झाला आणि या दुर्घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनास्थळावरून मृत शेतकऱ्याचे पुतणे रामेश्वर पांडुरंग खोडवे यांनी तातडीने माहिती देत डोणगाव पोलिस ठाण्यात
मृत्यूची नोंद केली आहे. पोलिस निरीक्षक संजय घिके यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
हे पण वाचा.
महावितरणच्या हलगर्जीपणाचा आरोप
नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी महावितरण कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत. परिसरात अनेक ठिकाणी लोंबकळलेल्या वीजतारा,
उघडे रोहित्र आणि योग्य देखभालीचा अभाव हे जीवघेणे धोके वारंवार समोर येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या दुर्घटनेनंतर गावकऱ्यांनी महावितरणकडून तातडीने सुधारणा करण्याची मागणी केली आहे.
शेतकरी सुरक्षेसाठी ठोस उपायांची मागणी
या घटनेने शेतकरी वीज सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शेतात उघड्या तारांमुळे किती मोठे संकट निर्माण होते,
हे या दुर्घटनेतून स्पष्ट झाले आहे. प्रशासनाने तातडीने सुरक्षा उपाययोजना केल्या नाहीत तर भविष्यात आणखी अनर्थ होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
शेतकरी सुरक्षा अपडेट्स मिळवण्यासाठी
👉 तत्काळ अपडेट्स, सरकारी योजना, शेतकरी सुरक्षा माहिती मिळवण्यासाठी KattaNews.in WhatsApp Channel जॉइन करा!
Related News










