Advertisement
वाशिम जिल्हा प्रतिनिधी/नारायणराव आरु पाटील
Risod Crime News: रिसोड बसस्टँडवर पाच हजार दोनशे रुपयांची चोरी झाल्याची घटना घडल्यानंतर रिसोड पोलिसांनी विजेगतीने तपास लावत अवघ्या काही तासातच पाकीटमाराला अटक करून रोख रक्कम जप्त केली. स्थानिक नागरिकांकडून या जलद कारवाईचे कौतुक होत आहे.शिवाजी बळीराम जाधव (वय ५४, रा. पानकन्हेरगाव, ता. सेनगाव, जि. हिंगोली) हे आपल्या मेहुणीकरीता कपडे खरेदी करण्यासाठी रिसोड येथे आले होते.Risod Crime News दुपारी २.३० च्या सुमारास रिसोड–हिंगोली बसमध्ये चढताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या पॅन्टच्या खिशातील ५२०० रुपये काढून चोरून नेले.फिर्याद नोंद होताच रिसोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांनी डीबी पथकाला तपासाच्या सुचना देताच तपास वेगाने सुरू करण्यात आला. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि आधुनिकी पद्धतींचा वापर करून आरोपीचा शोध घेण्यात आला.त्यात सैय्यद जुनैद सैय्यद अब्दुल कदीर (वय २३, रा. आजम कॉलनी, हिंगोली) हा संशयित युवक ओळखून त्यास बसस्टँड परिसरातून ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी चोरी केलेली पूर्ण ५२०० रुपयांची रोकड जप्त केली.या कार्यवाहीत पोलीस उपनिरीक्षक सचिन गोखले, पोहेकॉ रमेश गोडघासे, पोलीस अंमलदार विनोद घनवट, परमेश्वर भोणे, विनोद मस्के, सुधाकर सोन्नर यांनी सहभाग घेतला. संपूर्ण तपास मा. पोलीस अधीक्षक अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक लता फड, सहायक पोलीस अधीक्षक नवदीप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.
🔗 Related News
📢 वाचकांसाठी संदेश
KattaNews.in — महाराष्ट्रातील विश्वासार्ह आणि गतिमान स्थानिक न्यूज पोर्टल!
वाशिम,बुलढाणा आणि विदर्भासह महाराष्ट्रातील ताज्या Crime अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी KattaNews.in ला भेट द्या.