शेतात मजुरीसाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 3 जणांचा विजेचा शॉक लागून मृत्यू.

Electric shock news
Electric shock news

 

(गंगाधर बोरकर, वाशिम) kattanews network. :-      शेतात मजुरीसाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 3 जणांचा विजेचा शॉक लागून मृत्यू .सख्खे चुलतभाऊ दुसऱ्याच्या शेतात डवरणीच्या कामासाठी गेले असता त्यांना जमिनीवर पडलेल्या प्रवाहित वीजतारांचा स्पर्श झाल्याने शॉक लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. मुले घरी आली नाहीत, म्हणून वडील शोधायला गेले; मात्र त्यांनाही त्याचठिकाणी शॉक लागून त्यांचाही मृत्यू झाल्याची हृदद्रावक घटना पांगरी महादेव (ता. मंगरूळपीर) येथे १२ जुलैला सायंकाळच्या सुमारास घडली. वडील अशोक माणिक पवार (वय ३८ वर्षे), मुलगा मारोती अशोक पवार (२०) आणि पुतण्या दत्ता राजू पवार (१८ वर्षे) अशी मृतांची नावे आहेत.

 

 

 

प्राप्त माहितीनुसार, मंगरूळपीर तालुक्यातील शेवटचे गाव असलेल्या पांगरी महादेव येथील मारोती अशोक पवार आणि दत्ता राजू पवार हे दोघे चुलतभाऊ दुसऱ्याच्या शेतात मजुरीने डवरणीच्या कामाला गेले होते. शिवारात पडून असलेल्या प्रवाहित वीज तारेला स्पर्श झाल्याने दोघेही जागीच ठार झाले. मुले घरी उशिरापर्यंत परतलीनाहीत, म्हणून मारोतीचे वडील अशोकपवार हे शोधण्यासाठी गेले असता,त्यांचाही त्याचठिकाणी शॉक लागून घात झाला. या घटनेमुळे एकाच कुटुंबातील तिन्ही कर्त्या पुरुषांचा मृत्यू झाल्याने पवार कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.