ATM मध्ये बॅलन्स चेक करण्यासाठी अज्ञात व्यक्तीकडे दिले ,आणि त्याने 25000 रुपयाने गंडविले.

ATM
Atm

 

एटीएममध्ये ATM मध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्यास अज्ञात चोरट्याने २४ हजार ५०० रुपयांना लुबाडल्याची घटना शुक्रवारी घडली. चोरट्याने बॅलेन्स चेक करा म्हणत एटीएमची अदलाबदली करून शेतकऱ्याच्या खात्यातील पैसे लंपास केले आहेत. जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील एसबीआय बँकेच्या एटीएममध्ये ही घटना घडली. या प्रकरणी शेतकरी सुभाष जाधव (रा. वखारी वडगाव) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीवर सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

 

सुभाष जाधव व त्यांचा मित्र रोहिदास पवार हे दोघे जण शुक्रवारी सकाळी शहरातील कॅनरा बँकेत पीककर्जासंदर्भात आले होते. गावी जात असताना दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील एसबीआय बँकेच्या एटीएममधून त्यांनी ५०० रुपये काढले. पैसे काढून बाहेर येत असतानाच, एक अनोळखी व्यक्ती ते आला. तुम्ही खात्यातील बॅलेन्स किती आहे हे चेक करा, असे सांगितले. त्याने बळजबरीने एटीएम घेऊन स्टेटमेंट काढू लागला.

 

 

परंतु, स्टेटमेंट निघाले नाही. त्यानंतर सुभाष जाधव यांच्या हातात एटीएम दिले. जाधव यांना संशय आला. यानंतर एटीएममधून पैसे निघाले नाही. त्यानंतर युनियन बँकेच्या शाखेत गेले. तेथे बॅलेन्स चेक केले असता, २४ हजार ५०० रुपये काढण्यात आल्याचे त्यांना समजले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे