रिसोड (शहर प्रतिनिधी/ विजय जुंजारे) : रिसोड नगरपरिषद निवडणूक जवळ येताच शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. इच्छुक उमेदवार आता आपल्या उमेदवारीसाठी आवश्यक कागदपत्रे तयार करण्यात, पुरावे सादर करण्यात आणि नामांकन प्रक्रियेसाठी लागणाऱ्या औपचारिकता पूर्ण करण्यात व्यस्त झाले आहेत.
जन्मदाखले, रहिवासी प्रमाणपत्र, शिक्षणाची कागदपत्रे, मालमत्तेची माहिती आणि शपथपत्रे अशा विविध कागदपत्रांची तयारी करण्यात उमेदवार तल्लीन आहेत.
राजकीय पक्षांकडूनही संभाव्य उमेदवारांच्या निवडीसाठी अंतर्गत बैठकांना वेग आला आहे. पक्षनिष्ठा, जनाधार आणि स्थानिक लोकप्रियता यावर आधारित उमेदवारांची चाचपणी सुरू असून काही ठिकाणी गटबाजीचे संकेतही दिसून येत आहेत.
निवडणुकीचा बिगुल वाजताच शहरातील नागरिकांमध्येही उत्सुकता वाढली आहे. “कोण उभा राहणार, कोणास पक्षाची तिकिटे मिळणार?” या चर्चांनी बाजारपेठा आणि चौक गजबजले आहेत. येत्या काही दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल होताच स्थानिक राजकारणाचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.
👉 वाचकांसाठी सूचना
रिसोड नगरपरिषद निवडणुकीसंदर्भातील ताज्या घडामोडी, उमेदवारांची यादी, नामांकन अर्ज आणि राजकीय हालचाली जाणून घेण्यासाठी KattaNews.in वर नियमित भेट द्या.
📢 Follow करा: आमच्या Facebook आणि Twitter पेजवर नवीन अपडेटसाठी!
📰 Related News










