हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

पेट्रोल टाकून पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न; युवक काँग्रेस शहराध्यक्षा विरोधात गुन्हा दाखल, चिखलीत खळबळ.

On: November 10, 2025 8:30 AM
Follow Us:

चिखली (प्रतिनिधी)/विशाल गवई: चिखली नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक युवक काँग्रेसच्या शहराध्यक्षाविरुद्ध पत्नीने केलेल्या गंभीर तक्रारीमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

तक्रारीनुसार पतीने अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत संबंधित आरोपीस अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

तक्रारदार २९ वर्षीय नमिता विशाल उर्फ रिक्की काकडे यांच्या मते, त्यांचा विवाह सन २०२० मध्ये झाला. सुरुवातीचे काही महिने सर्व काही सुरळीत असले तरी त्यानंतर सासू आणि नणंद यांच्याकडून मानसिक व शारीरिक छळ सुरू झाल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. नमिताच्या म्हणण्यानुसार, सतत टोमणे, भांडणं आणि त्रास सुरू होता.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

तक्रारीनुसार, ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास पतीशी किरकोळ कारणावरून वाद झाला. त्याचवेळी पतीच्या मोबाईलवर आलेल्या एका अज्ञात मुलीच्या संदेशाबाबत विचारणा केली असता वाद उफाळल्याचे नमिताने सांगितले. नमिताच्या म्हणण्यानुसार, या घटनेदरम्यान सासू आणि नणंद यांनी पतीला चिथावले.

तक्रारीत म्हटले आहे की, यानंतर पती विशाल काकडे यांनी किचनमधील प्लास्टिकच्या बाटलीत असलेले पेट्रोल तिच्या अंगावर ओतले आणि गॅस सुरू करून तिच्या पदराला आग लावण्याचा प्रयत्न केला. सदर प्रसंगी नमिताने आरडाओरड करत बाथरूममध्ये पळ काढून पाण्याने स्वतःचा जीव वाचवला.

यानंतर नमिताने आई-वडिलांना संपर्क साधून घटनेची माहिती दिली. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून चिखली पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत पीडितेला पोलिस ठाण्यात आणले.

नमिताच्या लिखित तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता कलम 109, 49 आणि 3(5) अन्वये पती विशाल उर्फ रिक्की काकडे, सासू रेखा रघुवीर काकडे आणि नणंद भावना नकवाल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती विशाल काकडे यास अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

हे पण वाचा.

मेहकर हादरले! चिमुकलीचा मृतदेह मोकाट कुत्र्यांनी उकरून विद्रुप केला; शहरात खळबळ.

साखरखेर्डा पोलिसांचा शेंदुर्जनमध्ये जुगार अड्ड्यावर छापा; ८ आरोपींना अटक, मुद्देमाल जप्त.

पोलिस तपास सुरू
चिखली पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “तक्रारीनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पीडितेचे निवेदन नोंदविण्यात आले असून पुरावे संकलनाची प्रक्रिया सुरू आहे.”


🔴 सूचना :

ही घटना तक्रारीवर आधारित असून पोलिस तपास प्रलंबित आहे. आरोप सिद्ध होईपर्यंत कुणालाही दोषी मानले जाऊ शकत नाही.

👉 महाराष्ट्रातील सर्वात विश्वासार्ह आणि जलद अपडेट देणारे न्यूज पोर्टल — ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आणि सविस्तर बातम्यांसाठी आत्ताच भेट द्या :

➡️ www.kattanews.in

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

आमदार मनोज कायंदे यांची नितीन गडकरींकडे सिंदखेडराजा मतदारसंघातील रस्ते व पुलांच्या विकासकामांसाठी मागणी

सिंदखेडराजाच्या विकासकामांसाठी आ. मनोज कायंदे मैदानात; ना. नितीन गडकरींकडे रस्ते-पुलांसाठी निधीची मागणी

शिवनी आरमाळ ग्रामपंचायतीतील निधी व्यवहारावर चौकशीची मागणी

धक्कादायक! पदभार सोडलेल्या अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीवर ग्रामपंचायतीतून निधीची उचल?; गटविकास अधिकाऱ्याच्या भूमिकेवर प्रश्न

साखरखेर्डा येथे सुसज्ज बसस्थानक उभारण्याची मागणी

७५ गावांच्या प्रवाशांचा प्रश्न कधी सुटणार? साखरखेर्ड्यात सुसज्ज बसस्थानकासाठी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे साकडे

ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते अभिनेत्री व पत्रकार किरण वाघ यांना साई प्रेरणा गौरव पुरस्कार प्रदान करताना

शिर्डीत किरण वाघ यांचा दुहेरी गौरव! ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते ‘साई प्रेरणा गौरव पुरस्कार’

लोणार नगरपरिषदेत घरकुल योजनांतील अनियमिततेविरोधात निवेदन देताना डॉ. गोपालसिंह बछिरे व शिवसेना उ.बा.ठा. पदाधिकारी

घरकुल योजनांतील अनियमिततेविरोधात शिवसेना उ.बा.ठा. आक्रमक; 15 दिवसांत माहिती न दिल्यास लोणार नगरपरिषदेसमोर ठिय्या आंदोलनाचा इशारा

मेहकरमध्ये एका रात्रीत ज्वेलर्स आणि मेडिकल स्टोअरमध्ये धाडसी चोरी

मेहकर हादरले! ‘आज माझे दुकान… उद्या कोणाचे?’ एका रात्रीत ज्वेलर्ससह मेडिकल स्टोअर फोडले; व्यापाऱ्यांची उडाली झोप

Leave a Comment