नारायणराव आरु पाटील/प्रतिनिधी
कारंजा: कारंजा तालुक्यात कुष्ठरुग्ण शोध मोहीम (LCDC) १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. या LCDC मोहीम कारंजा अंतर्गत घराघर तपासणी, संशयित रुग्णांची ओळख पटवून त्वरित उपचार तसेच जनजागृती हा मुख्य उद्देश ठेवण्यात आला आहे.
राज्य सरकारच्या २०२७ पर्यंतच्या “कुष्ठरोग मुक्त महाराष्ट्र” या उद्दिष्ट पूर्तीसाठी ही मोहीम महत्त्वपूर्ण मानली जात आहे. कारंजा तालुका आरोग्य विभाग, वैद्यकीय अधिकारी, शालेय विद्यार्थी व स्थानिक प्रशासन यांच्या सहकार्याने कुष्ठरुग्ण शोध मोहीम राबविण्यात येणार आहे.
आज तालुका स्तरावरील समन्वय समितीची बैठक मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. ठोंबरे साहेब, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कावरखे व सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
मोहीमेदरम्यान गावात शालेय विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढून जनजागृती करण्यात येणार आहे. संशयित रुग्ण त्वरित सापडावे, उपचार सुरू करून संसर्गाची साखळी पूर्णपणे खंडित होणे, हा मोहिमेचा प्रमुख हेतू आहे.
या बैठकीस मा. गटविकास अधिकारी राणे मॅडम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एस. आर. नांदे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. एन. आर. साळुंके, महिला व बाल विकास अधिकारी श्री. एन. एस. लुंगे, तालुका आरोग्य सहाय्यक श्री. विनोद श्रीराव, समूह संघटक श्री. विनोद गायकवाड व श्री. रामहरी मुंदे उपस्थित होते.
मोहीमेचे सविस्तर मार्गदर्शन जिल्हा कुष्ठरोग पर्यवेक्षक श्री. एम. डी. खरतडे यांनी केले. तर संपूर्ण मोहिमेचे नियोजन कुष्ठरोग तंत्रज्ञ श्री. एस. डी. जाधव यांनी केले.
हे पण वाचा.
🔔 नागरिकांसाठी महत्त्वाचे आवाहन
मोहिमेदरम्यान आपल्या घरी येणाऱ्या सर्वेक्षण पथकाला सहकार्य करणे अत्यावश्यक आहे. घरातील सर्वांची तपासणी करून घ्या. वेळेवर उपचार घेतल्यास कुष्ठरोग पूर्णपणे बरा होऊ शकतो, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एस. आर. नांदे यांनी केले.
👉 वाशिम मधील इतर स्थानिक अपडेट्स वाचण्यासाठी येथे क्लिक करा: वाशिम










