Air india news : एअर इंडिया मूळे माझ्याकडे घालायला कपडे नाहीत ; महिला झाली संतप्त

Air india news

Air india news : एअर इंडिया air india कंपनीच्या बेजबाबदारपणाचे किस्से नवे नाहीत. कंपनीच्या ढिसाळपणाचे अनुभव अनेकदा अनेक प्रवाशांनी घेतले आहेत. पण, हा प्रकार घडला तो अमेरिकेहून america भारतात म्हणजे बंगळुरूत आलेल्या एका महिला संशोधक महिलेच्या बाबतीत. या महिलेचे लगेज विमानात चढवण्यास कंपनी विसरल्यामुळे सोशल मीडियावर social media  दाद मागण्याची वेळ तिच्यावर आली.

 

 

 

 

घडले असे :

अमेरिकेतील पूजा कथाली pooja kathali भारतात आल्यानंतर त्यांचे लगेज त्यांना मिळाले नाही. त्यांनी एअर इंडियाच्या कॉल सेंटरशी call center फक्त (?) ४० वेळा संपर्क साधला. मात्र, कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर व्यथा मांडली. “एअर इंडियाच्या बेजबाबदारपणामुळे माझ्याकडे परिधान करण्यासाठी कपडे नाहीत”, या तिच्या पोस्टनंतर एअर इंडियाने air india दिलगिरी व्यक्त करीत त्यांच्या लेगजचा शोध सुरू केला. ते सापडले की नाही ते माहीत नाही पण, कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे कसा मनःस्ताप होतो, त्याचे हे उदाहरण.

 

 

 

…आणि कंपनी जागी झाली

पूजा कथाली pooja kathali  ‘अमेरिकेत संशोधक’ म्हणून काम करतात. भारतात विवाह सोहळ्यासाठी त्या आल्या, पण त्यांचे लगेज आलेच नाही. त्यांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आणि अनेकांनी अनुभव कथन करून कंपनीचा कारभाराचे वाभाडे काढले.