वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव पाटील
वाशीम : वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील मालेगाव malegaon ‘पंचायत समितीच्या’ लिपिकाला साडेपाच हजारांची लाच घेताना आज ता. २३ रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केलीआहे आज रोजी तक्रारदाराच्या माहिती नुसार पंचायत समिती मधील कनिष्ठ सहाय्यक गजानन इंगोले (वय ५२ वर्ष) यांनी ता . २१ऑक्टोबर २०२४ रोजी पडताळणी कारवाईदरम्यान यातील तक्रारदार यांना ओलोसे इंगोले यांनी तक्रारदार यांच्या वडिलांच्या नावे असलेल्या सिंचन विहिरीच्या खर्चाची फाईल ऑनलाईन करून देण्याकरिता ६ हजार रुपयाची मागणी केली आज ता २३ रोजी सापळा रचुन कारवाई केली.
या दरम्यान आलोसे गजानन इंगोले यांनी सदर फाईल ऑनलाईन करून शासनाकडून रक्कम मिळवून देण्याकरिता तडजोडी अंती साडेपाच हजार रुपये पंचायत समिती कार्यालय मालेगाव येथे स्वीकारले तक्रारदार यांच्याकडून लाच रक्कम स्वीकारली वरून ओलोषे इंगोले यांना एलसीबीचे पथकांनी ताब्यात घेऊन त्यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन मालेगाव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. लाच लुचपत विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बालाजी तिप्पलवाड तसेच मार्गदर्शक पोलीस उप निरीक्षक गजानन आर शेळके कर्मचारी विनोद मार्कंडे, आसिफ शेख, योगेश खोटे नाविद शेख यांनी कारवाई करीता सहकार्य केले.