Skip to content
Menu
Offcanvas menu
    Home ताज्या बातम्या mahavikas aghadi : जागावाटपाचा वाद विकोपाला ; महाविकास आघाडीत बिघाडी !
    mahavikas aghadi
    ताज्या बातम्या

    mahavikas aghadi : जागावाटपाचा वाद विकोपाला ; महाविकास आघाडीत बिघाडी !

    Byकट्टा न्यूज October 19, 2024October 19, 2024Write a Comment on mahavikas aghadi : जागावाटपाचा वाद विकोपाला ; महाविकास आघाडीत बिघाडी !

     

     

    mahavikas aghadi

     

     

     

     

    mahavikas aghadi :विधानसभा निवडणुकीच्या vidhansabha election रणधुमाळीला सुरुवात होण्याच्या आधीच महाविकास आघाडीमधील mahavikas aghadi वाद आता विकोपाला पोहोचला आहे. महाविकास आघाडीत mahavikas aghadi  बिघाडीचे संकेत मिळाले आहेत. जागा वाटपाबाबत आघाडीची सुरू असलेली चर्चा चांगलीच बिघडली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले nana patole हे जागा वाटपाच्या चर्चे ला उपस्थित असतील तर ठाकरे गट चर्चेला येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. नाना पटोले यांची तक्रार काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडे देखील केली असल्याचे ठाकरे गटाने सांगितले आहे.

     

     

     

    महाविकास आघाडीच्या बैठकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले nana patole असतील तर यापुढे बैठक होणार नाही, अशी भूमिका ठाकरे गटाने घेतली आहे. ठाकरे गटाने अधिकृतपणे आपली भूमिका जाहीर केली आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्याबाबत नाना पटोले यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. संबंधित प्रश्न विचारल्यानंतर नाना पटोले तडक उठले आणि जाऊ लागले. याच वेळी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नाना पटोले यांना थांबवले. त्यानंतर पत्रकार परिषद पार पडली. राज्य पातळीवर काँग्रेसकडे निर्णय क्षमता नाही. आम्हाला काँग्रेस नेते राहुल गांधी rahul gandhi यांच्यासोबत बोलावे लागेल आणि तक्रार करावी लागेल, असे संजय राऊत म्हणाले आहेत. त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या ‘जागावाटपाचा तिढा’ कसा सुटणार ? हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

     

     

     

    ‘तुटेल इतकं ताणू नये’

    ■ ठाकरे गटाचे नेते आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले nana patole यांच्यात खटके उडाल्याची माहिती आहे. एका पेक्षा जास्त पक्ष जेव्हा एकत्र निवडणूक लढवतात तेव्हा नाही म्हटलं तरी जागांच्या बाबतीत खेचाखेची होते. पण ती तुटेपर्यंत ताणायची नाही हे सगळ्या पक्षांनी लक्षात ठेवले पाहिजे, असा इशारा उद्धव ठाकरे  uddhav thakre यांनी दिला.

    काँग्रेस नेते निर्णय घेण्यात सक्षम नसल्याचा टोला

    महाराष्ट्राचे काँग्रेस नेते निर्णय घेण्यात सक्षम नसल्याचा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. त्यांना वारंवार दिल्लीत लिस्ट पाठवावी लागते मग चर्चा होते. आता ती वेळ निघून गेली आहे. आमची इच्छा आहे की, लवकरात लवकर जागावाटपाचा निर्णय व्हावा. राष्ट्रवादी आणि शिवसेनेत फार काही मतभेद नाहीत. काँग्रेससोबतही नाहीत, पण काही जागा आहेत, ज्या ठिकाणी काँग्रेस पक्ष दावा करत आहे.

    शेवटी सर्व पक्षांचे हायकमांडच निर्णय घेतील : पटोले

    ■ संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांना माहिती देतील, त्यांची उद्धव ठाकरे यांनी नेमणूक केली आहे. आमची नेमणूक मल्लिकार्जुन खर्गे यांनी केलेली आहे. आम्ही त्यांच्याकडे बैठकीची माहिती देऊ. शेवटी सर्व पक्षांचे हायकमांडच निर्णय घेतील, असे पटोले म्हणाले.

    Post Navigation

    Buldhana : बुलडाणा जिल्ह्यात ४८ हजार मतदार यावर्षी नवीन करणार पहिल्यांदाच मतदान.

    Previous

    Buldhana : ठरलं तर मग..डॉ.राजेंद्र शिंगणे फुंकणार तुतारी..!! शरद पवार यांच्या भेटीसाठी मुंबईत दाखल..!!

    Next

    Related Posts

    parbhani news

    parbhani news | नीट’च्या तणावातून विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या.

    June 20, 2024June 19, 2024
    Dikshabhumi

    Dikshabhumi : २३ जनावर गुन्हा ; महिला पोलिसाला धक्काबुकी आणि शवीगाळ केल्याचा ठपका !

    July 4, 2024July 4, 2024
    वनमजूर

    वनविभागात निघाली १२ हजार वनमजूर पर्मनंट पद भरती ! पात्रता 4 थी पास.

    August 7, 2024August 7, 2024
    साखरखेर्डा

    साखरखेर्डा येथील बीएसएनएल कार्यालय कर्मचाऱ्याअभावी झाडा-झुडपांनी वेढले ; आणि येथे बीएसएनएल ची सेवा सुरु होणार ?

    August 2, 2024August 2, 2024

    Recent Posts

    • रिसोड : सर्व लोक गरजाराची साफसफाई करतात स्वच्छता करतात,मग माझी कोण करणार..? माझा फक्त वापर..
    • Washim : मनमिळावू व्यक्तीमत्व केशव हरणे यांचे निधन.
    • रिसोड विधानसभा मतदारसंघासाठी 20 ते 21 उमेदवारांचे अर्ज दाखल..
    • वाशिम मतदार संघात डॉक्टर सिद्धार्थ देवळे यांची उमेदवारी दाखल.
    • वंचित चे उमेदवार प्रशांत वाघोदे हे आज भरणार उमेदवारी अर्ज.

    Recent Comments

    1. A WordPress Commenter on Hello world!

    Archives

    • October 2024
    • September 2024
    • August 2024
    • July 2024
    • June 2024
    • May 2024

    Copyright © 2025 {Kattanews} - Powered by {kattanews}