Buldhana : बुलडाणा जिल्ह्यात ४८ हजार मतदार यावर्षी नवीन करणार पहिल्यांदाच मतदान.

Buldhana

 

 

बुलढाणा/प्रतिनिधी

 

महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या विधानसभेचा बिगुल वाजलेला आहे. निवडणुकीची व प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली आहे. संपूर्ण राज्यामध्ये 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यामध्ये मतदान पार पडणार आहे. बुलडाणा (buldhana) जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघासाठी तब्बल २१ लाख २४ हजार २२७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. तर ९५ हजार ८९७ नवीन मतदारांचा समावेश झाला आहे. यामध्ये ४८ हजार ३९७ नवमतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहे.

 

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर विधानसभा (vidhansabha) निवडणूक कार्यक्रमाची घोषणा झाली. त्यानंतर राज्यात आदर्श आचार संहिता लागू करण्यात आली. २२ ऑक्टोबर रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध होणार असून, उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी २९ ऑक्टोबर ही अंतिम तारीख देण्यात आली आहे. त्यानंतर ३० ऑक्टोबरला अर्जाची छानणी प्रक्रिया होणार आहे. ४ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे.

 

 

तालुका निहाय नवमतदार

 

मेहकर –  ७६२८

सिं. राजा – ५९१४

बुलढाणा – ६१२६

मलकापूर – ७३६२

बुलढाणा – ६१२६

ज.जामोद – ६२९७

खामगाव – ७९३२