न्यायालयात तारखेसाठी आलेल्या पत्नीवर पतीचा कोयत्याने हल्ला.

 

 

न्यायालयात तारखेसाठी आलेल्या पत्नीवर पतीचा कोयत्याने हल्ला. पती-पत्नीत वाद असल्याने नांदुरा न्यायालयात तारखेसाठी आलेली पत्नी ऑटोने जात असताना शहरातील मलकापूर रोडवर पतीने कोयत्याने वार केल्याची घटना शुक्रवारी घडली. गंभीर जखमी पत्नीला उपचारार्थ दवाखान्यात भरती करण्यात आले.याप्रकरणी कविता विष्णू खराबे (२७), रा. दुर्गानगर, नांदुरा यांच्या वतीने पोहेकों श्रीकृष्ण मोरे यांनी तक्रार दिली आहे.

 

त्यामध्ये विष्णू शंकर खराबे, रा. वाकुड, ता. खामगाव याच्याशी पत्नीचा मागील चार वर्षांपासून वाद आहे. आरोपीविरुद्ध न्यायालयात प्रकरण सरू आहे १६ ऑगस्ट रोजी नांदुरा न्यायालयात तारीख असल्याने कविता उपस्थित झाली होती. सुनावणी पुढे ढकलल्याने ती न्यायालयाबाहेर आली. यावेळी आरोपी पती दिसल्याने त्याला घाबरून कविताने ओळखीचा ऑटोचालक गणेश ज्ञानदेव फंड यांना बोलावले.

 

 

यावेळी ऑटोचालकाच्या पत्नी शारदा फंड ऑटोत होत्या. त्या ऑटोतून घरी जात असताना आरोपी विष्णू याने ऑटोसमोर येत कोयत्याने कविताच्या मनगटावर, मांडीवर वार करून गंभीर जखमी केले. जखमीला पती-पत्नीने दवाखान्यात भरती केले. आरोपीवर भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८ (२), १२७ (१), ३५२, ३५१ (३) नुसार गन्हा दाखल करण्यात आला.