Skip to content
Menu
Offcanvas menu
    Home ताज्या बातम्या महाविकास आघाडीचा २६० जागांचा तिढा सुटला ; पण राहिलेल्या २८ जागांसाठी जोरदार रस्सीखेच सुरु !
    महाविकास आघाडीचा
    ताज्या बातम्या

    महाविकास आघाडीचा २६० जागांचा तिढा सुटला ; पण राहिलेल्या २८ जागांसाठी जोरदार रस्सीखेच सुरु !

    Byकट्टा न्यूज October 18, 2024October 18, 2024Write a Comment on महाविकास आघाडीचा २६० जागांचा तिढा सुटला ; पण राहिलेल्या २८ जागांसाठी जोरदार रस्सीखेच सुरु !

     

     

    महाविकास आघाडीचा

     

     

     

    महाविकास आघाडीचा २६० जागांचा तिढा सुटला ; पण राहिलेल्या २८ जागांसाठी जोरदार रस्सीखेच सुरु ! महाविकास आघाडीला mahavikas aghadi महाराष्ट्रातील २८८ पैकी २६० जागांवरील तिढा सोडवण्यात यश आले आहे. पण या आघाडीतील तिन्ही मित्रपक्षांत २८ जागांवर कमालीची रस्सीखेच सुरू असल्यामुळे जागावाटपाची चर्चा अजून लांबण्याची भीती निर्माण झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या vidhansabha election  घोषणेनंतर जागावाटपाबाबत महाविकास आघाडीची सातत्याने बैठक सुरू आहे.

     

     

     

    मुंबईच्या mumbai सोफिटेल हॉटेलला झालेल्या मविआ नेत्यांच्या बैठकीत आतापर्यंत २६० जागांचा ‘तिढा’ सुटलेला आहे. उर्वरित २८ जागांवर तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच आहे. मविआचे जागावाटप फायनल करून १-२ दिवसांत उमेदवारांची यादी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. या बैठकीपूर्वी मविआत २०० जागांवर एकमत झाले होते, विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे तिन्ही पक्षातील जागावाटप लवकर सुटावे, यासाठी सकाळपासून मविआ नेते बैठकीला बसले आहेत. या बैठकीत संजय राऊत, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, सतेज पाटील आणि इतर नेते उपस्थित आहेत.

     

     

     

    मुंबईतील ३३ जागांवर एकमत

    ■ मुंबईतील ३६ पैकी ३३ जागांवर एकमत झाल्याची माहिती आहे. त्यात काँग्रेस १५, ठाकरेसेना १८ आणि राष्ट्रवादी २ आणि समाजवादी पार्टीला १ जागा देण्यावर सहमती झाली आहे. त्याशिवाय कुर्ला, भायखळा आणि अणुशक्तीनगर या जागांवर अद्याप पेच आहे. आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत महाविकास आघाडीचे जागावाटप जाहीर होऊ शकते असे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले होते.

     

     

    काँग्रेसची पहिली यादी २० ऑक्टोबरला

    काँग्रेसची विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची पहिली यादी २० ऑक्टोबरला येणार आहे. ८४ जागांबाबत उमेदवारी निश्चित झाली असून २० तारखेला पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे. त्याचदिवशी उमेदवारांची यादी जाहीर केली जाऊ शकते.

    Post Navigation

    बळीराजा चिंतेत ! सोयाबीन च्या भावात आणखी घसरण होण्याची शक्यता ?

    Previous

    buldhana : बिबी सुलतानपूर रोडवरील ए.एस. पेट्रोल पंपावर रात्री जबरी चोरी बिबी पोलिसांनी चार तासात लावला अज्ञात आरोपीचा छडा

    Next

    Related Posts

    Latest news: दूध घ्यायला गेलेल्या महिलेला ओढत नेऊन केला अत्याचार.

    July 2, 2024July 2, 2024
    Sindkhedraja

    Sindkhedraja | कार बिघडल्याने लाखो रुपयांची दारू सोडून चोरटे पळाले.

    July 28, 2024July 28, 2024
    Fraud

    Fraud : खोटेआमिष दाखवून घरकाम करणाऱ्या महिलांना कोटींचा गंडा

    July 2, 2024July 2, 2024
    शिक्षकांच्या नियुक्त्या

    राज्यात लवकरच होणार दुसऱ्या टप्प्यातील शिक्षकांच्या नियुक्त्या

    October 12, 2024October 12, 2024

    Recent Posts

    • रिसोड : सर्व लोक गरजाराची साफसफाई करतात स्वच्छता करतात,मग माझी कोण करणार..? माझा फक्त वापर..
    • Washim : मनमिळावू व्यक्तीमत्व केशव हरणे यांचे निधन.
    • रिसोड विधानसभा मतदारसंघासाठी 20 ते 21 उमेदवारांचे अर्ज दाखल..
    • वाशिम मतदार संघात डॉक्टर सिद्धार्थ देवळे यांची उमेदवारी दाखल.
    • वंचित चे उमेदवार प्रशांत वाघोदे हे आज भरणार उमेदवारी अर्ज.

    Recent Comments

    1. A WordPress Commenter on Hello world!

    Archives

    • October 2024
    • September 2024
    • August 2024
    • July 2024
    • June 2024
    • May 2024

    Copyright © 2025 {Kattanews} - Powered by {kattanews}