मोठी बातमी ! इतर वारसदारांचा आक्षेप नसेल तर विवाहित बहीणही अनुकंपा नोकरीसाठी पात्र.

 

अनुकंपा

 

 

 

मोठी बातमी ! इतर वारसदारांचा आक्षेप नसेल तर विवाहित बहीणही अनुकंपा नोकरीसाठी पात्र… दिवंगत कर्मचाऱ्याच्या इतर वारसदारांचा कोणताही ‘आक्षेप’ नसेल किंवा त्याच्या पश्चात केवळ विवाहित बहीणच असेल, तर या परिस्थितीत तिला अनुकंपा नोकरी नाकारली जाऊ शकत नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात स्पष्ट केले. न्यायमूर्तीद्वय भारती डांगरे व अभय मंत्री यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. पीडित विवाहित बहीण लिना येरमे यांचे भाऊ गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथील शिवाजी हायस्कूलमध्ये कर्मचारी होते. त्यांचे मांडली.

 

 

 

निधन झाल्यानंतर लिना यांच्या दुसऱ्या भावाने अनुकंपा नोकरीवरदावा केला नाही. त्यामुळे लिना यांनी नोकरीसाठी अर्ज केला असता त्यांची १ जानेवारी २०२० पासून सहायक शिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांच्या नियुक्तीला मान्यताही दिली. परंतु, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने लिना यांची विभागीय चौकशी करून त्यांना २१ सप्टेंबर २०१७ व ३१ डिसेंबर २००२ रोजीच्या शासन निर्णयानुसार अनुकंपा नोकरीकरिता अपात्र ठरविले. या नोकरीसाठी केवळ भावावर अवलंबून असलेली अविवाहित बहीणच पात्र आहे, असे त्यांना कळविण्यात आले. परिणामी, त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने अनुकंपा नोकरीच्या धोरणाचा उद्देश विचारात घेता ती याचिका मंजूर करून लिना यांना या नोकरीकरिता पात्र ठरविले.

 

 

 

शिक्षण मंडळावर ताशेरेही ओढले

उच्च न्यायालयाने यापूर्वी ‘स्वप्नाली काळभोर प्रकरणामध्ये विवाहित बहीणही अनुकंपा नोकरीकरिता पात्र असल्याचा निर्णय दिला आहे. परंतु, शिक्षण मंडळाने त्याची दखल घेतली नाही, ही दुर्दैवी बाब आहे. प्रशासनाच्या अशा कृतीमुळे पीडितांना आणखी पीडा सहन करावी लागते व न्यायाकरिता भांडावे लागते, असे परखड निरीक्षण या निर्णयात नोंदविण्यात आले. याचिकाकर्तीच्या वतीने अॅड. प्रदीप क्षीरसागर यांनी बाजू मांडली