सागर बोदडे/ मोताळा,प्रतिनिधी
मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांना जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना गणवेश वाटप मिळणेबाबत वंचित बहुजन आघाडी बुलढाणा जिल्हा यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.शालेय विद्यार्थ्यांना गणवेशना मिळणे व त्यांच्या विविध समस्यांना वंचितचे जिल्हा नेते माननीय प्रशांत भाऊ वाघोदे यांनी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब बुलढाणा यांच्यासोबत चर्चा केली सदर बाब ही अत्यंत निंदनीय व खेदजनक आहे असे यावेळी आदरणीय प्रशांत भाऊ वाघोदे बोलत होते .
यावर मा. CEO साहेबांनी तात्काळ या निवेदनावर दखल घेत बुलढाणा जिल्हा शिक्षणाधिकारी यांना या दालनात बोलवून सदर प्रकरणांमध्ये काय काय अडचणी आहेत ह्या जाणून घेतल्या व वरिष्ठांशी संपर्क करून आजच्या तारखेत जे काही ड्रेस उपलब्ध असतील ते तात्काळ वाटप करण्याचे आदेश दिले.कर्तव्यदक्ष सिईओ साहेब यांनी यामध्ये संबंधित कंपनी शी बोलून कुठल्याही प्रकारची मला चालढकल चालणार नाही येत्या आठ ते दहा दिवसांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण करावी असे आदेश सदर गणवेश कंपनीला दिले.
तसेच, येत्या आठ ते दहा दिवसांमध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रक्रिया पुर्ण होईल व तुम्हाला असे कुठल्याही प्रकारच्या आंदोलन करण्याची वेळ येणार नाही असे यावेळी माननीय सी ई ओ साहेबांनी जिल्हा नेते प्रशांत भाऊ वाघोदे व वंचित बहुजन आघाडीची संपूर्ण टीम यांना आश्वासित केले…!देऊळगाव राजा तालुक्यामधील ही प्रक्रिया सुरूही झाली आहे .यावेळी उपस्थित बुलढाणा जिल्हा सर्व पदाधिकारी मोताळा तालुका अध्यक्ष देऊळगाव राजा तालुका अध्यक्ष सिंदखेडराजा तालुका अध्यक्ष लोणार तालुका अध्यक्ष बुलढाणा शहराध्यक्ष तसेच सर्व तोला मोलाचे कार्यकर्ते उपस्थित होते…