
सागर बोदडे/मोताळा प्रतिनिधी
जसजसे पावसाचे दिवस कमी होत आहेत त्यानुसार परतीच्या पावसाने कायमचा जोर पकडला आहे . मलकापूर मोताळा व बुलढाणा या भागामध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने नळगंगा धरणात (nalganga dam) पाण्याची आवक वाढल्याने धरणाची 11 पैकी 5 गेट 4 इंचानी 9 वाजेच्या सुमारास उघडण्यात आले आहे. तरी नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे. आपली जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावी. नागरिकांनी नदीकाठी जाऊ नये असे आवाहन नळगंगा प्रकल्प, पूर नियंत्रक कक्ष यांच्याकडून करण्यात आले आहे. पुढील माहिती प्राप्त होताच लवकरच प्रकाशित करण्यात येईल.