लोणार : बंदुकीच्या धाकावर सराफा sarafa व्यावसायिकाजवळील रोख रकमेसह २८ लाख रुपयांचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याची घटना ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी घडली होती. या चोरट्यांच्या शोधासाठी लोणार पोलिसांचे तीन आणि स्थानिक गुन्हे शाखेची तीन पथके स्थापन करण्यात आली आहेत. सुलतानपूर येथील सराफा व्यावसायिक अदित्य अजितकुमार संचेती aditya ajitkumar sanchiti हे ११ ऑक्टोबर रोजी प्रतिष्ठानबंद करून दुकानातील ३५० ग्रम सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम बॅगेत भरून दुचाकीने लोणार येथे घराकडे येण्यासाठी निघाले होते. दरम्यान त्यांच्यावर पाळत ठेवून असलेल्या तिघांनी दुचाकीने त्यांचा पाठलाग केला.
तसेच ‘शारा’ गावाजवळील गतिरोधकावर आदित्य संचेती यांना अडवून मारहाण केली. तसेच बंदूक दाखवून संचेती यांच्या हातातील सोन्याच्या दागिन्यांची बॅग आणि त्यांचा मोबाइल घेऊन पळ काढला. या घटनेत जखमी झालेल्याआदित्य संचेती यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यांच्या तक्रारीवरून लोणार पोलिसांनी अज्ञात तिघांविरुद्ध लुटमारीचा गुन्हा दाखल केला. दरम्यान, जिल्हा पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांनी १३ ऑक्टोबर रोजी घटनास्थळाला भेट देवून पाहणी केली. तसेच घटनास्थळावर श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. पुढील तपास पोलिस निरीक्षक निमिष मेहेत्रे व लोणार पोलिस करीत आहेत.