
देऊळगाव राजा/ प्रतिनिधी
गणेश विसर्जनानंतर काढण्यासाठी गेलेल्या तीस वर्षे युवकाचा विद्युत तारेचा स्पर्श लागून मृत्यू झाल्याची घटना बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील देऊळगाव राजा (deulgaoraja) शहरांमध घडली आहे. सविस्तर वृत्त असे की देऊळगाव राजा शहरांमध्ये कोंडवाडा चौकामध्ये यावर्षी प्रथमच छत्रपती शासन मंडळाच्या वतीने गणपतीची स्थापना करण्यात आली होती. गणपती विसर्जनानंतर गुरुवारी रात्री पप्पू विष्णू लाड (३४ वर्षे) हा युवक मंडपावर टाकलेली ताडपत्री काढण्यासाठी मंडपावर चढला असता त्यावरून विद्युत वाहिनी गेली होती.
तर त्या विद्युत तारेचा जबरदस्त धक्का युवकाला लागला व तो जमिनीवर कोसळला. पप्पू विष्णू लाड याला विजेचा धक्का लागल्यानंतर लगेचच देऊळगाव राजा शहरातील संपूर्ण वीजपुरवठा बंद करण्यात आला व त्वरित त्या युवकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. गणेश भक्ताचे असे एकाकी जाण्याने देऊळगाव राजा शहरांमध्ये दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे.