राज्यात परतीच्या पाऊस ; पुढील ३ दिवस मेघगर्जेनेसह जोरदार पावसाची शक्यता !

 

पाऊस

 

 

 

राज्यात परतीच्या पाऊस ; पुढील ३ दिवस ‘मेघगर्जेनेसह’ जोरदार पावसाची शक्यता !  राज्याच्या काही भागांत परतीचा पाऊस पडत असून, पुढील तीन दिवस पावसाचे आहेत. मध्य महाराष्ट्र, कोकणात मेघगर्जनेसह काही भागांत जोरदार, तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली.

 

 

मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू असून संपूर्ण उत्तर प्रदेशातून तसेच मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार आणि झारखंड राज्याच्या काही भागातूनही मान्सून परतला आहे. मान्सूनच्या परतीची सीमा शुक्रवारी दरभंगा, हजारीबाग, पेंद्रा रोड, नरसिंहपूर, खरगोन, नंदूरबार आणि नवसारी भागात होती. तर पुढील दोन दिवसांत गुजरात, मध्य प्रदेश, झारखंड आणि बिहारच्या उरलेल्या भागातून तर महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या काही भागातून – मान्सूनचा परतीचा प्रवास होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. राज्यात शुक्रवारी पुणे, महाबळेश्वर, नाशिक, सोलापूर, रत्नागिरी, बीड, बुलढाणा व वर्धा येथे हलका, मध्यम ते जोरदार पावसाची नोंद झाली.

 

 

 

१२ ऑक्टोबरला कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार, तर मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. १३ ऑक्टोबरला कोकण, मध्य महाराष्ट्रात काही भागात जोरदार आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, लातूर आणि बीड जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. तसेच १४ ऑक्टोबर रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, लातूर आणि बीड जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. राज्यात सर्वांत जास्त तापमान ब्रह्मपुरी येथे ३६.४ अंश सेल्सिअस इतके होते.