kalaram mandir latest news : नाशिकच्या काळाराम मंदिराच्या आसपास राहणाऱ्या लोकांना धमकीचे पत्र प्रसिद्ध करण्यात आले होते. ते प्रसिद्ध करणाऱ्याला अटक करण्यात आली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिली. हे पत्रक व्हायरल केल्याप्रकरणी काँग्रेस-शरद पवार गटाच्या नेत्यांनाही फडणवीस यांनी समज दिली असून, शहानिशा न करता तसे पत्र व्हायरल केल्यास समाजात तेढ निर्माण होईल.
यामुळे राजकीय नेत्यांनी आपली सामाजिक जबाबदारी ओळखली पाहिजे, असे ते म्हणाले. नाशिकच्या काळाराम मंदिर आणि परिसरात काही विशिष्ट समाजातील लोकांना प्रवेश वर्ज्य असल्याचे पत्रक काढण्यात आले होते.या प्रकरणानंतर शनिवारी पंचवटी भागात तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी फडणवीस म्हणाले, पोलिसांनी या प्रकरणाची उकल केली आहे. ते पत्रक प्रसिद्ध करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे.