
MS Dhoni latest news : महेंद्रसिंग धोनी mahendra singh dhoni आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. मात्र, त्याची लोकप्रियता कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. माही नेहमी कुठल्याही पद्धतीने चर्चेत असतो. चाहते त्याला ‘थाला’ संबोधतात. फिफानेदेखील धोनी अर्थात थालाला पुन्हा चर्चेत आणले. फिफाने आपल्या इन्स्टाग्रामवर दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्टियानो रोनाल्डोचा फोटो पोस्ट केला.
या फोटोला जे कॅप्शन दिले त्यात ‘थाला फॉर अ रिझन’ असे लिहिले. ही पोस्ट भारतीय चाहत्यांनी इतकी व्हायरल केली की, फिफालादेखील याचे आश्चर्य वाटले. आयपीएलदरम्यान ७ क्रमांकाची जर्सी घालणारा चेन्नईचा माजी कर्णधार धोनी याच्यासाठी चाहत्यांनी ‘थाला फॉर अ रिझन’ ट्रेंड सुरू केला होता. विशेष असे की, ख्रिस्टियानो रोनाल्डोच्या जर्सीचा क्रमांकदेखील ७ आहे. त्यामुळेच फिफाने FIFA हा ट्रेंड स्वीकारला असावा. शिवाय कॅप्शनमध्येही ‘थाला’ हा शब्द आवर्जून वापरला असावा.