buldhana crime : जन्मदात्यानेच पोटच्या मुलीचा लैंगिक छळ केला. बापलेकीच्या नात्याला कलंक लावला. या वासनांध बापास येथील विशेष न्यायालयाचे न्यायाधीश आर. एन. मेहरे r.n. mehre यांनी पाच वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. गुरुवार, ३ ऑक्टोबरला हा महत्त्वपूर्ण निकाल देण्यात आला.शहरातील एका भागात राहणाऱ्या कुटुंबामधील घटनेच्या वेळी अकरा वर्षे वय असलेली मुलगी १६ जुलै २०१९ रोजी आरोपी बापाच्या खोलीमध्ये लॅपटॉपवर laptop चित्रपट पाहात होती. आरोपी उशीरा रात्री घरी परतला. नियत फिरलेल्या बापाने मुलीवर लैंगिक अत्याचार केला.
घटनेवेळी मुलीची आई मुंबईला mumbai नोकरीनिमित्त गेलेली होती. त्यामुळे मुलीने ही घटना काकूला सांगतली. आई घरी परतल्यानंतर मुलीने बापाच्या कृत्याविषयी सांगितले. समाजात बदनामी होऊ नये म्हणून तक्रार देण्याचे टाळण्यात आले. दरम्यान, काही महिने लोटल्यानंतर १८ मे २०२० रोजी रात्री पुन्हा त्याने मुलीस आपल्याजवळ येण्यास सांगून आपला वाईट उद्देश दाखवून दिला. मात्र त्यावेळी पत्नी व त्याच्यात भांडण झाले. अखेर पोलिसांत तक्रार देण्यात आली. शहर पोलिसांनी आरोपी बापाविरुद्ध भादंवि कलम ३५४, ३७६ (२), (एफ) ३७६ (अ) (ब) व पोक्सो अॅक्टचे pocso act कलम ४, ८, १२ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले. आरोपीस अटक करण्यात आली. पोलिसांनी सखोल तपासाअंती न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. हा खटला विशेष न्यायाधीश आर. एन. मेहरे यांच्या न्यायालयात सुरू झाला.
जास्तीत जास्त शिक्षेसाठी युक्तीवाद
जिल्हा सरकारी वकील अॅड. वसंत भटकर यांनी सात साक्षीदार तपासले. पीडित मुलगी, तिची आई, पीडितेची काकू, घटनास्थळ पंच, वैद्यकीय अधिकारी व तपास अधिकाऱ्यांची साक्ष महत्त्वाची ठरली. नातेसंबंधाचे कुठलेही भान न ठेवता आरोपीने पोटच्या मुलीवर अत्याचार केला. ही बाब गंभीर असल्याने त्याला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी, असा युक्तीवाद अॅड. भटकर यांनी १ ऑक्टोबर २०२४ रोजी केला.
विनयभंग, पोक्सोअंतर्गत ठरविले दोषी
विशेष न्यायाधीश मेहरे यांनी भादंवि कलम ३५४ व पोक्सो अॅक्टनुसार आरोपीस दोषी ठरविले. पाच वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा आरोपीला ठोठावण्यात आली. तसेच दंड न भरल्यास चार महिने कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली. गुन्ह्याचा तपास पीएसआय विनित घाटोळ यांनी केला. कौर्ट पैरवी म्हणून एएसआय किशोर कांबळे यांनी सहकार्य केले.