sindkhed raja : शेतकऱ्यांचा आक्रोश ; आम्हाला मदत द्या नाहीतर आमच्यावर गोळ्या झाडा !

sindkhed raja

sindkhed raja : गेल्या तीन दिवसापासून सिंदखेड राजा sindkhed raja आणि किनगाव राजा kingaon raja  महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली असून अद्याप शेतकऱ्यांना कुठल्याही शासनाकडून मदतीचा आश्वासन मिळाले नाही, म्हणून आम्हाला एक तर मदत द्या, नाहीतर आमच्यावर गोळ्या झाडा याच्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नाही, असा आक्रोश करून हजारों शेतकऱ्यांनी शेतकरी मित्र सिंदखेड राजा आणि शेतकरी योद्धा कृषी समिती बुलढाणा buldhana जिल्हा यांच्या वतीने २६ सप्टेंबर तहसीलदार यांना निवेदनाव्दारे केली. सिंदखेड राजा तालुक्यातील सिंदखेड राजा व किनगाव राजा मंडळामध्ये २३ ते २५ सप्टेंबर २०२४ या तिन दिवसात सतत तीन दिवस अतिवृष्टी झालेली आहे. सदर अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची अतोनात नुकसान झालेले आहे.

 

 

 

सोयाबीनचे नुकसान १०० टक्के झाले असून कपाशीचे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाला असून त्याला या नुकसान भरपाई मिळण्याची गरज आहे. त्यामुळे योग्य ती कारवाई करून सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे आदेश देऊन झालेले नुकसान भरपाई शेतकऱ्याला कशी मिळेल यासाठी आपण स्वतः तत्काळ पाठपुरावा करावा, अशी विनंती शेतकरी मित्र मंडळाचे दिलीप चौधरी dilip chaudhari व शेतकरी योद्धा कती समितीचे समन्वयक बालाजी सोसे यांना सदस केली आहे. या परिसरामध्ये २४ सप्टेंबर रोजी ३१.५ मिमी, २५ सप्टेंबर ६७.५ मिमी व २६ सप्टेंबर ३८.८ मिमी पाऊस झाला असून किनगाव राजा महसूल मंडळ येथील पर्जन्यमापक यंत्रणा पूर्णपणे बंद असून संबंधित ‘तालुका कृषी अधिकारी’ यांनी त्या यंत्रणेचा पंचनामा केला.

 

 

 

त्याच पंचनामांमध्ये संबंधित सिंदखेडराजा येथील रेन फॉल रिपोर्ट हे किनगाव राजा मंडळाला लागू करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. त्यामुळे सिंदखेडराजा महसूल मंडळाचा नियम लावून किनगाव राजा मंडळाला मदत मिळावी, तसेच संबंधित कर्मचाऱ्यांना पंचनामा करण्याचे आदेश काढण्यात यावे, अन्यथा सिंदखेडराजा मंडळातील व किनगाव राजा मंडळातील शेतकरी आंदोलन करतील, असा इशारा दिला आहे. यावेळी निवेदन देताना शेतकरी मित्र दिलीप चौधरी, शेतकरी योद्धा कृती समितीचे समन्वयक बालाजी सोसे, शेतकरी गोविंदराव टेके, जनार्दन मुंडे, विशाल मुंडे, उद्धव मुंडे, नरसिंग सोसे, दत्तात्रय झोरे, दत्तात्रय बोडके, देवानंद सोसे, गणेश मुंडे, जगदीश मुंडे, संदीप राऊत, आसन शेख आदी असंख्य शेतकरी उपस्थित होते.