ladki bahin yojana : खुशखबर ! बहिणींनो तुम्हाला पैसे आले की नाही? अहो लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता मिळण्यास सुरुवात

ladki bahin yojana

ladki bahin yojana : या योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या बँक खात्यात bank account जमा होण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे वितरण २९ सप्टेंबर रोजी केले जाईल असे राज्य सरकारतर्फ सांगण्यात आले होते. त्यानुसार आज या योजनेतील पैशांचे वितरण करण्यास सुरुवात झाली आहे. महिला व बालविकास कल्याण मंत्री आदिती तटकरे aditi tatakre यांनी याबाबतची माहिती दिली आहे. अनेक महिलांच्या बँक खात्यात १,५०० रुपये जमा झाले आहेत. पैशांच्या वितरणाची प्रक्रिया चालू झाली असून काहीच वेळात सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात bank account पैसे जमा होतील.

 

 

आदिती तटकरे aditi tatakre यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर यासंदर्भात एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभ हस्तांतरणाच्या तिसऱ्या टप्प्यात सुरुवात झाली असून दिनांक २९ सप्टेंबर रोजी ३४,७४,११६ भगिनींना ५२१ कोटी रुपयांचा लाभ हस्तांतरण करण्यात आला आहे. उर्वरित भगिनींना लाभ हस्तांतरणाची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असून सर्व पात्र भगिनींना महिना अखेरपर्यंत लाभ मिळणार आहे. ज्या भगिनींना आधी लाभ मिळाला होता त्यांना तिसरा हफ्ता आणि ज्यांना आधी तांत्रिक अडचणींमुळे लाभ मिळाला नव्हता त्यांना यावेळेस तिन्ही हफ्ते एकत्र देण्यात आले आहेत.