रिठद येथे तहसिलदार प्रतिक्षा तेजनकर यांची नदी लगत असलेल्या पुलाची पाहणी.

 

 

वाशीम जिल्हा प्रतिनिधी/ नारायणराव आरु पाटील

 

रिठद येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही अडोळ नदीला पूर आलेत, त्यामुळे गावचा संपर्क तुटला तालुक्याला व जिल्ह्याला जाण्यासाठी गावातील एखादा पेशंट आजारी पडल्यावर जिल्ह्याला किंवा मोठ्या दवाखान्याचा द्यावयाचे असल्यास गावकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागतो. हा प्रकार दरवर्षीच घडतो. नदीला सतत पूर येत असल्यामुळे रिसोडच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी गावालगत असलेल्या दोन्ही पूलाची पाहणी केली.

 

 

 

त्यामध्ये राज्यमार्ग क्रमांक ५१ ला जोडून असलेला जोडरस्ता रिठद ते ढोरखेडा रस्ता, मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत डांबरीकरण करण्यात आले.व अजूनही काम होणे बाकी आहे.त्यामध्येच वाढीव अंदाजपत्रक पूलासाठी केले तर कायमची समस्या गावकऱ्यांची सुटेल.त्यासाठी मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत काम करणाऱ्या कार्यकारी अभियंता यांनी मुख्यमंत्री सडक योजनेच्या माध्यमातून नवीन पूल होण्यासाठी दखल घेणे गरजेचे आहे.यासाठी तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी त्या विभागाचे अधिकारी यांचेशी बोलेन असे सांगितले आणी नदीच्या खोलीकरणासाठी स्थानिक स्तरचे कार्यकारी अभियंता आकुस्कर आणी उपविभागीय अधिकारी प्रेम शिंदे

 

 

 

यांच्याशी बोलून नदीचे खोलीकरण करण्यासाठी आदेशीत करेन असे सांगितले या अडोळ नदीमध्ये मध्ये कोल्हापूरी बंधारा वाशिम जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाचे माध्यमातून निर्माण करण्यात आला त्याही बंधाऱ्याचे खोलीकरण करने गरजेचे आहे.तर गावातील हनुमान मंदीराजवळून खडकी ढंगारे गावच्या सिमेपर्यंत (महसुली सीमा)अडोळ नदीचे खोलीकरण स्थानिक स्तर पाटबंधारे विभागाचे माध्यमातून करण्यात यावे अशी माहिती शिवसेना तालुकाप्रमुख नारायण आरु यांनी यासंदर्भात माहिती दिली.ती पूर्णपणे करुन घेऊ असे या पाहणी दरम्यान बोलतांना तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी सांगितले.

 

 

 

तसेच खडकी ढंगारे गावाजवळील लहान पूलावरुन नेहमी पूराचे पाणी असते त्या जागेवर जास्त उंचीच्या पूलाची गावकऱ्यांना गरज आहे.त्यासाठी जिल्हा परिषद बांधकाम विभाग वाशिम यांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली जाईल व गावकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करु असेही बोलतांना रिठद येथे सांगितले. यावेळी महसूल मंडळ अधिकारी पडवे, तलाठी रूपाली संत्रे, तलाठी दुबे,कोतवाल रवि आरु, धनंजय बोरकर विश्वनाथ आरू, दीपक राऊत, बद्री बोरकर, अशोक आरु, गणेश आरु, भगवान खानझोडे, अशोक बोरकर, गजानन आरु इत्यादी मंडळी पाणी दरम्यान उपस्थित होती.