नारायण आरु पाटील वाशीम जिल्हा प्रतिनिधी
विहीरीतील मृतदेह शोध पथकाने बाहेर काढला…दि.२३ अकोला akola जिल्ह्य़ातील पिंजर pinjar येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथक,शाखा मंगरूळपीरच्या जवानांची साहसी कामगीरी 60 फुट खोल विहरीतुन बाहेर काढला मृतदेह.‘मानोरा’ पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील देवठाणा येथील शेतातील विहरीत एक ईसम बुडाल्याची माहीती आज दुपारी पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दिपक सदाफळे यांना माहीती देऊन तात्काळ सर्च ऑपरेशन करीता पाचारण केले.
क्षणाचाही विलंब न करता मंगरूळपीर mangalurpir शाखेचे आपले सहकारी अतुल उमाळे,गोपाल गीरे,शुभम भोपळे,लखन खोडे,सागर डाके,यांना आज घटनास्थळी पाठवीले आणी तात्काळ सर्च ऑपरेशन चालु केले असता आज 23 सप्टेंबर रोजी दुपारी अथक प्रयत्नांनंतर विहरीतील मृतदेह बाहेर काढून पोलीसांच्या ताब्यात दीला _मृतक हे गणेश शेषराव वानखडे अं.वय (35) वर्ष रा.देवठाणा ता.मानोरा जि.वाशिम येथील असल्याचे निष्पन्न झाले यावेळी मानोरा पोलीस ठाण्याचे पिआय प्रविण शिंदे साहेब,पिएसआय अभिजीत बारे साहेब, पो.हे.काॅ.अमर धनकर, साहेब,आणी नातेवाईक हजर होते.अशी माहिती पथक प्रमुख दिपक सदाफळे यांनी दीली आहे.